मनमाड : पोलिसांच्या विशेष पथकाने मनमाड शहरात छापा मारून आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या २ जणांना अटक केली. या ठिकाणाहून एक लाख ९० हजार रुपये रोख रकमेसह लॅपटॉप, मोबाइल जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात क्रिकेटवर सट्टा घेणाºयांची टोळी असल्याचे समोर आले आहे. शहरातील हनुमाननगर भागातील एका बंगल्यात सध्या सुरू असलेल्या आयपीलच्या क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात बेटिंग घेतली जात असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांना मिळाल्या नंतर त्यांनी विशेष पथकाला छापा मारण्याचा आदेश दिला. या पथकाने बंगल्या जवळ सापळा रचून छापा मारून सुनील हांडगे, अफजल शेख या दोघांना ताब्यात घेतले तर सागर केकाण, संजू पाटील व सागर गांगुर्डे या तिघांचा पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
क्रि केट सामन्यावर सट्टा; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:19 IST