शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या पोर्टेबिलिटीने हजारो ग्राहकांना मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:20 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ईपीडीएस प्रणालीची राज्यात अंमलबजावणी करण्यात आल्याने कोणत्याही शिधापत्रिका-धारकाला हव्या त्या रेशन दुकानातून धान्य घेण्याची मुभा पोर्टेबिलिटीने देण्यात आल्याने त्याचा प्रभावी वापर शिधापत्रिकाधारकांकडून होऊ लागला असून, पंधरा दिवसात सुमारे अकरा हजारांहून अधिक शिधापत्रिकाधारकांनी आपल्याला सोयीच्या रेशन दुकानाची धान्य घेण्यासाठी निवड केल्याचे समोर आले आहे.

नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ईपीडीएस प्रणालीची राज्यात अंमलबजावणी करण्यात आल्याने कोणत्याही शिधापत्रिका-धारकाला हव्या त्या रेशन दुकानातून धान्य घेण्याची मुभा पोर्टेबिलिटीने देण्यात आल्याने त्याचा प्रभावी वापर शिधापत्रिकाधारकांकडून होऊ लागला असून, पंधरा दिवसात सुमारे अकरा हजारांहून अधिक शिधापत्रिकाधारकांनी आपल्याला सोयीच्या रेशन दुकानाची धान्य घेण्यासाठी निवड केल्याचे समोर आले आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने एप्रिल महिन्यापासून राज्यात ईपीडीएस प्रणालीचा सक्तीने वापर सुरू केला आहे. ज्या शिधापत्रिका-धारकाचे आधार क्रमांक नोंद असेल तसेच ज्याचे बोटाचे ठसे पॉस यंत्राशी जुळतील अशा पात्र शिधापत्रिकाधारकांनाच रेशनमधून स्वस्त दरात धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय संपूर्ण प्रणालीच संगणकीय झाल्यामुळे शिधापत्रिकाधारकाला आपल्या हव्या त्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात व पाहिजे त्या रेशन दुकानातून धान्य देण्यासाठी पोर्टेबिलिटीची सुरुवात करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात ६ मेपासून पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार चालू महिन्यात २२ मेपर्यंत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांतून ३,१७,४४१ शिधापत्रिका-धारकांना धान्याचे वाटप करण्यात आले असून, त्यापैकी ११,०१६ जणांनी पोर्टेबिलिटीने आपल्याला हव्या त्या दुकानातून धान्याची उचल केली आहे. त्यात नाशिक शहरात ३३२६ शिधापात्रिकाधारकांचा समावेश आहे. नाशिक शहरात प्रामुख्याने परभणी, बीड, लातूर तसेच पेठ, सुरगाणा येथील मजुरांचे स्थलांतर झालेले असून, त्यांच्यासाठी पोर्टेबिलिटीची सोय अधिक महत्त्वाची मानली जात आहे.ग्राहकांची पळवापळवीरेशनच्या पोर्टेबिलिटीने आता रेशन दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांची पळवापळवी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने रेशनच्या धान्य विक्रीसाठी कमिशनमध्ये वाढ केल्यामुळे अधिकाधिक रेशनची विक्री करण्यासाठी दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना आमिष दाखविण्याबरोबरच ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, त्यातून ग्राहकांचीच सोय होणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय