शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

‘सावाना’मुळे लाभला अनेक दिग्गजांचा सहवास

By admin | Updated: April 12, 2017 01:55 IST

नरेश महाजन : जुन्या कार्यकारिणीच्या निरोप समारंभात व्यक्त केल्या भावना

नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेमुळे आयुष्यात आपल्याला अनेक सुवर्णक्षण बघायला मिळाले. वाचनालयामुळे अनेक दिग्गजांचा सहवास लाभला, हीच खरी संपत्ती आहे, अशी भावना सार्वजनिक वाचनालयाचे मावळते उपाध्यक्ष नरेश महाजन यांनी जुन्या कार्यकारिणीला निरोप आणि नवीन कार्यकारिणीचे स्वागत करण्यासाठी मंगळवारी (दि. ११) आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात व्यक्त केली.सार्वजनिक वाचनालयाच्या मिटिंग हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या आठवणींना उजाळा देताना महाजन यांनी, वयाच्या २२ व्या वर्षापासून वाचनालयाची अखंड सेवा करायला मिळाली, वाचनालयाचा पहिला साहित्यिक मेळावा ते पन्नासावा साहित्यिक मेळाव्याचा भाग होता आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित नूतन कार्यकारिणीचे स्वागत करताना महाजन यांनी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करा, भांडण करा, न्यायालयात जा पण चांगली कामे करा, असे आवर्जून सांगितले. शहरातील नागरिक आणि वाचकांशी प्रतारणा न करण्याचे आवाहन केले. यंदाच्या निवडणुकीत नवीन आणि अनुभवी उमेदवार निवडून आल्याने वाचनालयाला निश्चितच फायदा होणार असल्याचे नरेश महाजन यांनी सांगितले.वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी आपल्या मनोगतातून समाजात वाचनालयाची बिघडलेली प्रतिमा खोडून काढण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, असे सांगताना आपल्या मनात कुणाबद्दलही राग नसून नवीन जबाबदारी चोखपणे पार पाडणार असल्याचे सांगितले. निवडणूक संपली असून आता नव्याने काम सुरू करायचे आहे, राष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक वाचनालयाचे नाव होण्याच्या दृष्टीनेदेखील प्रयत्न करणार असल्याचे तसेच नाशिकमधील इतर वाचनालय सावानाशी जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे औरंगाबादकर यांनी यावेळी सांगितले.या छोटेखानी बैठकीदरम्यान नूतन कार्यकारिणीतील सर्वच्या सर्व अठरा सभासदांसह जुन्या कार्यकारिणीतील नरेश महाजन आणि सरल धारणकर उपस्थित होते. तसेच देणगीदार प्रतिनिधी विनायक नेर्लीकर आणि वाचनालयाचे अंतर्गत लेखा परीक्षक सी. जे. गुजराथी आदि उपस्थित होते. दरम्यान, आज बुधवारी (दि. १२) संध्याकाळी ६.३० वाजता नवीन कार्यकारिणी पदभार स्वीकारणार असून पदांचेदेखील वाटप केले जाणार आहे. (प्रतिनिधी)