शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवा : सुधीरकुमार बुके 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:23 IST

पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विविध विभागांमार्फत असलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ तालुक्यातील गरजू लाभार्थींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यांचे समुपदेशन करून योजनांची माहिती करून देण्याचे काम ग्रामसेवक व लोकप्रतिनिधींचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरण नाशिकचे सचिव न्या. सुधीरकुमार बुके यांनी केले़

त्र्यंबकेश्वर : पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विविध विभागांमार्फत असलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ तालुक्यातील गरजू लाभार्थींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यांचे समुपदेशन करून योजनांची माहिती करून देण्याचे काम ग्रामसेवक व लोकप्रतिनिधींचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरण नाशिकचे सचिव न्या. सुधीरकुमार बुके यांनी केले़  त्र्यंबकेश्वर येथील पंचायत समितीच्या कै. महाले कोंडाजी सकाळे सभागृहात तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी, लोकसेवक यांच्या सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत देण्यासाठी करोडो रुपयांची तरतूद दरवर्षी केली जाते, तथापि गरिबांना, दिव्यांगांना व महिलावर्गाला लाभ मिळण्याऐवजी आलेला निधी लाभ न दिल्यामुळे परत पाठवावा लागतो, हे योग्य नाही. लाभार्थींना लाभ मिळालाच पाहिजे. यावेळी पंचायत समिती सभापती ज्योती जयवंत राऊत, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, उपसभापती रवींद्र भोये, सदस्य देवराम शिवा मौले, मोतीराम दिवे, अलका मधुकर झोले, मनाबाई शिवाजी भस्मा, सहायक गटविकास अधिकारी समीर वाठारकर, इमारत व दळणवळण विभागाचे उपअभियंता निळे, तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी योगेश मोरे, शाखा अभियंता आहेरनाना आदींसह सर्व सदस्य व अधिकारी उपस्थित होते. आभार उपसभापती रवींद्र भोये यांनी मानले, तर सभापती ज्योती राऊत यांच्या हस्ते न्या. सुधीरकुमार बुके यांचा सत्कार करण्यात आला.दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींसाठी मेळावासाधारणत: मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सर्व विभागांचे स्टॉल व सर्व अधिकारी उपस्थित राहतील. यासाठी तालुक्यातील महिलावर्ग, अपंग, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, गरीब अशा लोकांनी या मेळाव्यासाठी जरु र यावे, असे आवाहन न्या. सुधीरकुमार बुके यांनी केले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद