शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती कार्यालयावर घरकुल लाभार्थींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:01 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्थींना घराचे पूर्ण बांधकाम करूनही घरकुलाचा तिसरा व चौथा हप्ता अद्यापही मिळाला नसल्याच्या कारणाने येथील पंचायत समिती कार्यालयावर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसुरगाणा : डीवायएफआय संघटनेच्या वतीने आयोजन

सुरगाणा : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्थींना घराचे पूर्ण बांधकाम करूनही घरकुलाचा तिसरा व चौथा हप्ता अद्यापही मिळाला नसल्याच्या कारणाने येथील पंचायत समिती कार्यालयावर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.मोर्चानंतर झालेल्या सभेत उपसभापती इंद्रजित गावित, पेठ येथील डीवायएफआयचे तालुकाध्यक्ष महेश टोपले, पालघर येथील पं. स. सदस्य नंदू हाडळ, सुभाष भोये, पांडुरंग गायकवाड, भारती चौधरी, तुळशीराम खोटरे, मोनिका पवार, देवीदास हाडळ, एसएफआयचे राज्य कमिटी अध्यक्ष अजय टोपले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थींच्या मागणीबाबतचे निवेदन घरकुल योजनेचे सहायक प्रकल्प अधिकारी डॉ. संजय माळी यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल ब यादीतील ३९७४ लाभार्थींना शासनामार्फत पहिला व दुसरा हप्ता मिळाला आहे, मात्र तिसरा व चौथा हप्ता लाभार्थीने घराचे बांधकाम पूर्ण करूनही मिळालेला नाही. परिणामी गरीब आदिवासी लाभार्थींची मोठी हेळसांड होत आहे. तिसरा व चौथा हप्ता मिळेल या भरवशावर उसनवारी करून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. हप्ता तर मिळालाच नाही मात्र ज्यांच्याकडून उसनवारी केली ते पैसे मागत असल्याने लाभार्थी मेटाकुटीला आला आहे. राज्य व केंद्र सरकारच्या परस्परविरोधी राजकारणाचा बळी गरीब आदिवासी लाभार्थी पडू नये यासाठी या मोर्चाचे आयोजन डीवायएफआय संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी रोजगार हमी योजनेचे दोन वर्षांपासून पैसे मिळाले नसल्याचे तसेच विहिर प्रकरण व घरकुल हफ्त्यासाठी लाभार्थी कडून पैसे घेत असल्याची तक्र ार करण्यात आली. यापुढे असे घडल्यास तक्रार करण्याचे व संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन सहायक प्रकल्प अधिकारी डॉ. संजय माळी व गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिले.आश्वासनानंतर उपोषण मागेगुरुवारपासून (दि.६) यासंदर्भात पंचायत समितीसमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र, शासनाचे आदेश प्राप्त होताच पुढील कार्यवाही तालुकास्तरावरून तत्काळ करण्याचे लेखी आश्वासन पंचायत समितीकडून देण्यात आल्याने उपोषणास बसलेले सुभाष भोये, पांडुरंग गायकवाड, राहुल अहेर, मेनका पवार, भारती चौधरी, नितीन गावित, तुळशीराम खोटरे, देवीदास हाडळ, योगेश जाधव, कृष्णा भोये, लक्ष्मण कनोजे, राहुल गावित, कान्हा हिरे, नितीन पवार यांनी उपोषण मागे घेतले.

टॅग्स :Strikeसंपpanchayat samitiपंचायत समिती