सटाणा : कोरोना महामारी काळात नागरिक आरोग्य आणीबणीने त्रस्त असताना ‘महागाई’ने गगनाला हात टेकवले आहेत. या कारणास्तव केंद्र आणि राज्य सरकारविरोधात वंचित बहुजन आघाडी बागलाण तालुक्याच्या वतीने सटाणा तहसील कचेरीसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरण असंवेदनशीलतेमुळे घरगुती इंधन, दळवळण इंधन, खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय संसाधने, घटकांचे दर नागरिकांच्या आर्थिक आवाक्याबाहेर पोहोचले आहेत.
सामान्य नागरिकांची आर्थिक गणिते कोलमोडली असताना महागाईने त्रस्त जनतेला धोरणात्मक दिलासा देण्याऐवजी दोन्ही सरकारे हातावर हात टेकून बघ्याची भूमिका घेत असल्याने जनतेच्या असंतोषाचा उद्रेक समोर येण्याची चिन्हे आहेत. त्याचाच भाग म्हणून सोमवारी वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यभर आंदोलन छेडण्यात आले. बागलाणचे तहसीलदार यांना निवेदन सादर केल्यानंतर जिल्हा प्रवक्ता प्रा. अमोल बच्छाव, माजी तालुकाध्यक्ष चेतन वनिस, तालुका महासचिव दादासाहेब खरे यांनी पक्षाच्या भूमिकेबद्दल मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव यांनी उपस्थितांचे आभार मानून आंदोलनाची सांगता करण्यात आली.
यावेळी जिल्हा सचिव आनंद दाणी, जिल्हा संघटक सुनील जगताप, तालुका संघटक कडू वनिस, तालुका प्रसिद्धीप्रमुख कैलास आहिरे, सहसचिव दिलीप गांगुर्डे, पदाधिकारी दीपक बच्छाव, नीलेश देवरे, सचिन आहिरे, साहेबराव मोरे, किशोर म्हसदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
----------------
महागाईने होरपळलेल्या जनतेला धोरणात्मक उपाययोजना राबवून या विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, अन्यथा सरकारला धारेवर धरण्यासाठी आणखी तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. कोरोनाचा काळ, साथरोग प्रतिबंधक कायदा नियमावली यांचा विचार करत जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन या सर्वांशी समन्वय राखून हे आंदोलन पार पडले असल्याचे वंचित बहुजन आघाडी बागलाणतर्फे सांगण्यात आले.
----------------------
सटाणा येथे महागाईविरोधात आंदोलन करताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी. (२१ सटाणा २)
===Photopath===
210621\21nsk_23_21062021_13.jpg
===Caption===
२१ सटाणा २