शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बेलगाव कु-हे येथे लष्करी गोळ्याच्या स्फोटात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:30 IST

इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील घरात बुधवारी दुपारी लष्करी हद्दीतून आणलेल्या गोळ्याची छेडछाड करताना झालेल्या स्फोटात एक जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अजय संजय शिरसाठ असे मृताचे नाव असून, या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील घरात बुधवारी दुपारी लष्करी हद्दीतून आणलेल्या गोळ्याची छेडछाड करताना झालेल्या स्फोटात एक जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अजय संजय शिरसाठ असे मृताचे नाव असून, या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावालगतच लष्कराची हद्द असून, तेथे सरावावेळी पडलेले दारूगोळे घरी आणले असल्यामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. बुधवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास उत्तम मुठे यांच्या घरात अचानक स्फोटाचा आवाज झाला. स्फोटात मुठे यांच्या घराचे पत्रे हवेत उंच उडून आजूबाजूला पडले. त्यामुळे ग्रामस्थांची भंबेरी उडून अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. अजय शिरसाठ या युवकाने लष्करी हद्दीत जवानांनी सरावासाठी सोडलेल्या एखाद्या गोळ्याचा काही भाग घरी आणला होता. लोखंडी साहित्याच्या सहाय्याने तो गोळ्याची तोडफोड करत असताना त्यातील दारूगोळ्याशी झालेल्या स्पर्शाने स्फोट होऊन त्यात अजय जागीच ठार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्याचा मृतदेह बघून गावकरी घाबरले. जखमी मुठे परिवार जिवाच्या आकांताने मदत मागत होते. या स्फोटामुळे गावातील अनेक घरांना जोरदार हादरे बसले असून अनेक घरांचे कौले, पत्रे फुटले आहेत. ग्रामस्थही अचानक झालेल्या स्फोटामुळे भयभीत झाले आहेत.फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंची तपासणी करण्यासाठी सर्व साहित्य व काही सुटे भाग पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपविभागीय पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.भीषण स्फोट झाल्यानंतर विखुरलेल्या घरगुती साहित्याची पाहणी करतांना अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड. समवेत उपविभागीय पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख.  बेलगाव कुºहे गावालगत लष्कराची हद्द असून, हद्दीत सराव चालतो. सरावानंतर पडलेल्या गोळ्याचे साहित्य काही ग्रामस्थ घरी आणतात. यात असलेले तांबे, पितळ, शिसे आदी भंगारात विक्र ी करून ते उदरनिर्वाह करतात. या भागात नागरिकांना प्रवेश नसतो. नियमाचा भंग करणाºयावर लष्करी अधिकारी कठोर कारवाई करतात. मात्र अजय नेमका कधी गेला आणि त्याने हद्दीतून कसे व किती साहित्य आणले याचा तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Blastस्फोट