शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कट्टर विरोधक आघाडीत असल्याने बंड होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:50 IST

धुळे लोकसभेचा निकाल लागून मतदारांनी भाजपचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पारड्यात मतदान करून पुन्हा एकदा त्यांना लोकसभेत काम करण्याची संधी दिली आहे.

धुळे लोकसभेचा निकाल लागून मतदारांनी भाजपचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पारड्यात मतदान करून पुन्हा एकदा त्यांना लोकसभेत काम करण्याची संधी दिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असले तरी मालेगाव मध्य मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा फारसा परिणाम होणार नाही, अशी स्थिती आहे.मालेगाव मध्य मतदारसंघ हा कायम कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. माजी मंत्री जनता दलाचे समाजवादी नेते दिवंगत निहाल अहमद यांना पराभूत करून आमदार रशीद शेख यांनी कॉँग्रेसचा झेंडा नेहमीच या मतदारसंघात फडकवत ठेवला आहे. अपवाद फक्त गेल्या २००९ मधील निवडणुकीचा ठरला. माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी २००९ मध्ये विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी करीत कॉँग्रेस आमदार रशीद शेख यांचा पराभव केला होता; मात्र माजी आमदार विद्यमान महापौर रशीद शेख यांचे पुत्र आसिफ शेख यांनी २०१४ मध्ये राष्टÑवादी कॉँग्रेसकडून उमेदवारी करणाऱ्या मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा पराभव करीत रशीद शेख यांच्या २००९ मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली होती. विधानसभा निवडणूक येत्या दोन महिन्यावर येऊन ठेपली आहे. शिवसेना आणि भाजपची युती असूनही या मतदारसंघात त्यांचा पारंपरिक मतदार नाही. लोकसभा निवडणूक निकालाचा फारसा प्रभाव मालेगाव मध्य मतदारसंघात शक्य नाही. कारण हा मतदारसंघ मुस्लीमबहुल मतदारांचा आहे. या मतदारसंघात कॉँग्रेस विरोधातच पारंपरिक विरोधकांमध्ये लढतीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात कॉँग्रेस विरोधात माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्यातच लढतीची शक्यता आहे. मात्र कॉँग्रेस आणि राष्टवादी कॉँग्रेस यांच्यात आघाडी असल्याने मौलाना कोणता निर्णय घेतात यावर पुढील लढतीचे गणित अवलंबून आहे.मालेगाव मध्य मतदारसंघ  कायमच कॉँग्रेससोबतलोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला पुन्हा दुसऱ्यांदा संधी मिळाली असली तरी त्याचा मालेगाव मध्य मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नाही. कारण मालेगाव मध्य मतदारसंघात बहुसंख्य मुस्लीम मतदार असून, हा मतदार जनता दलाचा काही काळ वगळता नेहमी कॉँग्रेस बरोबर राहिला आहे. विधानसभेसाठी विद्यमान आमदार आसिफ शेख आणि माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल या परंपरागत राजकीय विरोधकातच लढत होण्याची शक्यता असून, माजी महापौर मलिक इसा आणि निहाल अहमद यांचे पुत्र बुलंद एकबाल यांची भूमिका लक्ष्यवेधी ठरणार आहे. काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस यांच्यात युती असल्याने विद्यमान आमदार आसिफ शेख यांच्या विरोधात एमआयएम (वंचित आघाडी) कुणाला उमेदवारी देते यावर पुढील गणिते अवलंबून आहेत. कारण काँग्रेस - राष्टÑवादी कॉँग्रेस यांच्यात आघाडी असल्याने मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल बंडखोरी करून अपक्ष किंवा वंचित आघाडीतर्फे लढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdhule-pcधुळे