शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:11 IST

नाशिक : विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापक महासंघाने सुरू केलेले कामबंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयाची औपचारिक घोषणा बुधवारी (दि. १०) मुंबईत एमस्फुक्टोच्या बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनिर्णय : एमस्फुक्टोच्या बैठकीत घोषणेची शक्यता

नाशिक : विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापक महासंघाने सुरू केलेले कामबंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयाची औपचारिक घोषणा बुधवारी (दि. १०) मुंबईत एमस्फुक्टोच्या बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी दि. २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन पुढे सुरूच ठेवण्यात आले होते. प्राध्यापक महासंघ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय अध्यापक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेऊन प्राध्यापकांनी लढा सुरूचठेवला होता. नाशिकमधील प्राध्यापकांनी ओझर व नाशिक दौºयावर असलेल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. (पान २ वर)प्राध्यापकांच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत मागण्यांविषयी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी (दि.८) झालेल्या बैठकीत मागण्यांविषयी लेखी आश्वासन देत प्राध्यापकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार प्राध्यापकांनी कामबंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाची अधिकृत घोषणा बुधवारी मुंबईत एमस्फुक्टोची बैठकीत केली जाणार आहे.रिक्त जागांवर भरतीचे आश्वासनप्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी शंभर टक्के पदे भरण्याचे आश्वासनासह शिक्षकीय संवर्गाची ६० टक्के शिक्षकांची पदे व उर्वरित ४० टक्के पदे तासिका तत्त्वावर भरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. तसेच संप काळातील ७१ दिवसांचे वेतन प्राध्यापकांना देण्याची कार्यवाही करण्यासोबतच सातव्या वेतन आयोगासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन सरकारने दिल्याची माहिती स्फुक्टोचे उपाध्यक्ष नंदू पवार यांनी दिली आहे, तर प्राध्यापकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली जुन्या पेन्शन योजनेची मागणी सरकारने धुडकावून लावली आहे. तसेच विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाºया कर्मचाºयांना नियमित करण्यासंदर्भात सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र प्राध्यापकांच्या रिक्त जागांची भरती आणि संप काळातील वेतनाची मागणी मान्य झाल्याने प्राध्यापक संघाने नरमाईची भूमिका घेत संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.