शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी सुरु असलेले आमरण उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 19:43 IST

अंदरसुल : पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई झाल्याने व प्रशासनाच्या वेळ काडू धोरणाचा निषेध करीत बोकटे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी सुरु केलेले आमरण उपोषण अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देबोकटे ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांची एकजुट; अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन

अंदरसुल : पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई झाल्याने व प्रशासनाच्या वेळ काडू धोरणाचा निषेध करीत बोकटे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी सुरु केलेले आमरण उपोषण अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.बोकटे येथे पालखेड कालव्याच्या आवर्तनातही पाणी मिळाले नाही, नंतर येवल्याच्या पाण्याबरोबर आरक्षीत असलेल्या पालखेडच्या पाण्याने बंधारे कोरडेच राहिल्याने परिसरातील पाण्याचे झरे आटल्याने विहिरी बोरवेल कोरडे झाले आहेत, त्या मुळे बोकटे पंचक्र ोशीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्या मुळे कुटुंबासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्या मुळे दोन तीन किलो मीटर अंतरावर गोरगरिबांना पाण्यासाठी भटकंती करावे लागत आहे. म्हणुन गावांसाठी, वाडीवस्तीवर टँकर कुटुंबासाठी तसेच मोठ्या प्रमाणात असलेल्या पशुधनासाठी ग्रामस्थांनी बोकटे ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन दिले होते, कि गावावरती निर्माण झालेला पाणी प्रश्नावर त्वरीत दखल घेऊन टँकर सुरु करावे. मात्र अपेक्षीत टँकर सुरु न झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी दि. ५ एप्रिल रोजी बोकटे येथील संभाजी दाभाडे, किरण दाभाडे, भाऊसाहेब कदम, बापुसाहेब दाभाडे, हितेश दाभाडे, प्रदीप दाभाडे, निखिल दाभाडे यांनी बोकटे येथे ग्रामपंचायती समोर आमरण उपोषण सुरू केले.त्यात बोकटे येथील असंख्य महिला हांडे घेऊन ग्रामपंचायत समोर सुरु असलेल्या उपोषणात सहभागी झाल्या. त्यावेळीं गावातील ग्रामस्थांनी टँकर द्या, नळाने सुरू करा पण पाणी पुरवठा करा. अशी मागणी केली. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे आज हि परिस्थीती निर्माण झाली असून नंतर गटविकास अधिकारी यांच्याकडे उपोषणाची त्वरीत दखल घेऊन बोकटेकरांना न्याय मिळवून द्यावा यासाठी विनंती केली. म्हणुन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आहिरे यांनी बोकटे येथे उपोषणकर्त्यांची भेट घेतली. बोकटेसह वाडी-वस्तीवर टँकर सुरुकरण्याबाबत लेखी आश्वासन देऊन महिलांसह गावकऱ्यांना दिलासा मिळाला व उपोषण मागे घेण्यात आले.