शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विंध्यवासिनी यात्रोत्सवाला सुरुवात

By admin | Updated: October 1, 2016 23:27 IST

दिंडोरीत घरोघरी घटस्थापना

दिंडोरी : नवरात्र उत्सवाने ग्रामीण भागासह अनेक ठिकाणी उत्सवाच्या वातावरणात महिलावर्गानी घट बसविण्यासाठी बाजारपेठेत दोन दिवसांपासून मोठी गर्दी केली होती. शनिवारी मोठ्या उत्साहात घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. विविध देवी मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांनी देवीची प्रतिस्थापना केली आहे. दिंडोरी परिसरात बाजार पटांगण पालखेड रस्त्यावरील चौफुली आदि ठिकाणी विक्रेते काळ्या मातीचे घट, लहान आकाराच्या टोपल्या, मातीचे दिवे, हळद कुंकू, शेंदूर, पूजेसाठी लागणाऱ्या कापसाच्या वाती, ओटी खण, नारळ या वस्तूंबरोबरच देवीच्या आकर्षक मूर्ती व प्रतिमा खरेदीसाठी महिलांनी पसंती दर्शविली. नागरिकांची वर्दळ बाजारपेठेत दिसून येत असल्याने बाजारपेठेला गर्दीचे स्वरूप प्राप्त झाले होते. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवामुळे तरुण-तरुणी यांची दांडियासाठी साहित्य घेतानाचे चित्र दिसून येत होते. अनेक मंडळांची दांडिया उत्सवानिमित्त तयारी चालू आहे.दांडिया रसिकांमध्ये दांडगा उत्साह दिसून येत आहे. शहरात दांडियारासचे आयोजन करण्यात येते. विंध्यवासिनी मातेच्या यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे, तर शुक्र वारपासून वणी सप्तशृंग गडावरून राज्याच्या विविध ठिकाणी ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांनी वणी- कळवण रोड भक्तिमय झाला होता; मात्र रस्त्याला खड्डे पडल्याने मोठी दुरवस्था झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)