शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
3
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
4
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
5
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
6
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
7
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
8
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
9
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
10
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
11
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
12
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
13
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
14
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
15
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
16
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
17
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
18
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
19
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
20
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 

ंनाशकातून डिफेन्स क्लस्टरची सुरुवात

By admin | Updated: July 3, 2017 00:28 IST

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’च्या मोहिमेअंतर्गत संरक्षण साहित्य उत्पादनावर भर दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारत अजूनही संरक्षण क्षेत्रात आयातीवर विसंबून असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’च्या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत संरक्षण साहित्य उत्पादनावर भर दिला असून, त्यासाठी महाराष्ट्रातील पाच ठिकाणांची निवड या संरक्षण साहित्य निर्मिती व त्यांच्या पूरक उद्योगांसाठी करण्यात आली आहे. या डिफेन्स क्लस्टरची सुरुवात नाशिकपासूनच करण्याची घोषणा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे. महाकवी कालिदास कलामंदिर येथे महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरतर्फे आयोजित नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष मंडलेचा यांचा रविवारी (दि.२) नागरी सत्कार सोहळा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. देशमुख बोलत होते. व्यासपीठावर, बोस्टन एमआयटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ रमेश रासकर, आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे तसेचमहापौर रंजना भानसी, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, अमित कामत, अनिलकुमार लोढा आदी उपस्थित होते. सत्कार सोहळ्याला उत्तर देताना मंडलेचा यांनी डिफेन्स क्लस्टरची सुरुवात नाशिकपासून व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर बोलताना डॉ. सुभाष भामरे यांनी क्लस्टरची सुरुवात नाशिकपासूनच करण्याचे आश्वासन देताना यासाठी उद्योजकांचाही सहभाग अपेक्षित असल्याचे सांगितले. ते म्हणाले, १९६२च्या युद्धात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर देशांतर्गत शस्त्रास्त्रनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. परंतु, विकसित तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या अभावामुळे आपण शस्त्रास्त्र निर्मितीत मागे पडलो. त्यामुळे संरक्षण साहित्यासाठी आयातीवर निर्भर राहावे लागत होते. परंतु आता परिस्थिती बदलत असून, भारत शस्त्रास्त्रांची निर्यात करीत असून, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यात तसेच खासगी उद्योगांच्या मदतीने ‘एफ-१६’ सारख्या लढावू विमानांची निर्मिती देशात सुरू होणार आहे.