पंचवटी : गंगाघाटावरील जुना भाजीबाजार येथे जनकल्याणासाठी लक्ष्मी कुबेर यज्ञ तसेच महामण्डलेश्वर श्री महंत इंद्रदेवेश्वरानंद सरस्वती यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथेला प्रारंभ झाला. या भागवत कथेनिमित्ताने रविवारी सकाळी रामकुंड येथून भागवत ग्रंथ, गोदावरी जल आणि ग्रंथ कथाकारांची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महामण्डलेश्वर श्री महंत इंद्रदेवेश्वरानंद सरस्वती, कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती, तपनशास्त्री शुक्ल, यांच्यासह साधू-महंत सहभागी झाले होते. रामकुंड येथून काढण्यात आलेली शोभायात्रा पुढे मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, मेनरोड, दहिपूल आदी परिसरातून काढण्यात येऊन गंगाघाटावरील जुन्या भाजीबाजारात समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत कलशधारी महिला तसेच भाविक सहभागी झाले होते. संपूर्ण आठवडाभर सुरू राहणाऱ्या या भागवत कथेदरम्यान पहिले तीन दिवस लक्ष्मी व नंतर कुबेर यज्ञ तसेच अन्य विविध धार्मिक कार्यक्र म होणार आहेत. सलग आठवडाभर सायंकाळी ४.३० ते७.३० या वेळेत भागवत कथा संपन्न होणार आहे. (वार्ताहर)
इंद्रदेवेश्वरानंद यांच्या भागवत कथेला प्रारंभ
By admin | Updated: April 24, 2017 02:10 IST