शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बनकर यांची उपआयुक्तपदी बदली वर्षभरात

By admin | Updated: December 28, 2015 22:42 IST

बदली झाल्याने आश्चर्य : सुनील गायकवाड नगरला

नाशिक : राज्यातील २१ जिल्हा परिषद व विभागीय आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाले असून, नाशिक जिल्हा परिषदेचे वर्षभरापूर्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुनील गायकवाड यांची बदली झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच बदली झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची विभागीय आयुक्त कार्यालयात उपआयुक्त (आस्थापना) या पदावर बदली झाली आहे.जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांची विशेष बाब म्हणून जालना येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. याचप्रकारे विशेष सूट देत नामदेव नन्नावरे यांची बीडला मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे. नन्नावरे हे बीडलाच मुख्य कार्यकारी अधिकारी राहतील. त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. म्हस्कर यांची जळगावलाच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रमुखपदी बदली झाली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त (विकास) नृसिंह मित्रगोत्री यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात त्याच पदावर बदली झाली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर जेजुरकर यांची अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. तसेच नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे यांची औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात उपआयुक्तपदी बदली झाली आहे. या पदावरील अशोक कोल्हे यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारपदी बदली झाली आहे. राज्यातील २१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा या शासन आदेशात समावेश आहे. (प्रतिनिधी)