शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदाराची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: February 12, 2017 22:57 IST

नागरिकांचा मागासप्रवर्गात रंगणार लढत; कार्यकर्त्यांच्या बंडखोरीचे आव्हान

 संदीप झिरवाळ  पंचवटीउमेदवारी नाकारल्यामुळे पक्षांतर्गत झालेली गटबाजी, आमदार बाळासाहेब सानप यांच्याच निकटवर्तीयांनी भाजपाला रामराम ठोकून वेगळा गट तयार करून कोणी शिवसेनेत, तर कोणी मनसेत प्रवेश करून भाजपासमोर आव्हान ठाकण्यासाठी उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. जो येईल त्याला उमेदवारीचा शब्द सानप यांनी दिला खरा, मात्र ऐनवेळी सानप यांनी शब्द न पाळल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून थेट सानप यांनाच आव्हान दिले आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप हे नागरिकांचा मागासप्रवर्ग गटातून रिंगणात असल्याने आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अ नागरिकांचा मागासप्रवर्ग गटातून भाजपाकडून आमदार सानप यांचे सुपुत्र मच्छिंद्र सानप, राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक समाधान जाधव, शिवसेनेकडून विलास आव्हाड, मनसेचे संदीप भवर उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या गटात खरी लढत ही सानप व समाधान जाधव यांच्यात होण्याची दाट शक्यता आहे. सानप हे भाजपा विद्यमान आमदार, शहराध्यक्ष असल्याने त्यातच गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी स्वत: या प्रभागाचे नेतृत्व केल्याने त्यांनी मुलाला रिंगणात उतरविले आहे, तर जाधव यांनी सलग दोनवेळा प्रभागाचे लोकप्रतिनिधित्व केले आहे. ब सर्वसाधारण महिला गटातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विद्यमान नगरसेवक सुनीता शिंदे, भाजपाच्या प्रियंका माने, शिवसेनेच्या प्रमिला शेवाळे यांच्यासह अपक्ष रेणुका घोडे, हेमलता वाघ यांच्यात लढत दिली असली तरी खरी लढत ही शिंदे व माने यांच्यातच होण्याची शक्यता आहे.क सर्र्वसाधारण महिला गटातून मनसेकडून विद्यमान नगरसेवक ज्योती गांगुर्डे, भाजपाकडून कुसूम शिंदे, शिवसेनेकडून पूनम मोगरे निवडणूक लढवित आहेत. राष्ट्रवादीने याठिकाणी महिला उमेदवार दिलेला नाही. गांगुर्डे या पूर्वी भाजपाच्या असल्या तरी त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर मनसेत प्रवेश केला आहे.ड सर्वसाधारण गटातून विद्यमान नगरसेवक रूचि कुंभारकर, शिवसेनेकडून हर्षद पटेल, राष्ट्रवादीकडून गौरव गोवर्धने, मनसेचे सोमनाथ बोडके हे निवडणूक रिंगणात आहेत. गेल्यावेळी मनसेचे रेल्वे इंजिन जोरात धावल्याने कुंभारकर निवडून आले होते. या गटातील लढत ही भाजपाविरुद्ध अन्य पक्षांची आहे. याच गटात अन्य अपक्ष असले तरी ते पाहिजे तसा टिकाव धरू शकणार नसल्याचे बोलले जाते.