शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेमुळे अडकले लाभार्थ्यांचे धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 19:01 IST

नाशिक : समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या योजनांचा थेट निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाची अडचण असल्याचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या बैठकीत उघड झाले.समाजकल्याण सभापती सुनीता रामदास चारोस्कर यांच्या उपस्थितीत समाजकल्याण विभागाची मासिक बैठक झाली. बैठकीत समाजकल्याण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. पंचायत समिती स्तरावर बहुतांश निधी अखर्चित ...

नाशिक : समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या योजनांचा थेट निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाची अडचण असल्याचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या बैठकीत उघड झाले.समाजकल्याण सभापती सुनीता रामदास चारोस्कर यांच्या उपस्थितीत समाजकल्याण विभागाची मासिक बैठक झाली. बैठकीत समाजकल्याण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. पंचायत समिती स्तरावर बहुतांश निधी अखर्चित असून हा निधी अद्याप खर्च का केला नाही? याचा जाब सभापती सुनीता चारोस्कर यांनी अधिकाºयांना विचारला. ज्या योजनांचा खर्च झाला नाही. त्या योजनांचा निधी वेळेत खर्च झाला नाही, तो शासनाला परत करण्याच्या सूचना सुनीता चारोस्कर यांनी दिल्या. अपंगांचा तीन टक्के निधी खर्च करण्याबाबत पंचायत समिती स्तरावर उदासिनता असून, योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात गटविकास अधिकारी कमी पडत असल्याने योजनांचे फलक पंचायत समिती बाहेर लावण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना देण्याबाबत आदेश सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले. तसेच तीन टक्के अपंग निधीतून जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात ३० लाख रूपये खर्चून उदवाहक (लिफ्ट) बसविण्यास अपंग कल्याण आयुक्तांनी मान्यता दिल्याने त्याबाबतची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. दलीतवस्ती सुधार योजनेतर्गंत२ ६३४ कामांना १० टक्के निधी देणे बाकी असून, ७७ कामे अद्याप सुरूच झालेली नाही. ही कामे तात्काळ रदद करून त्या कामांचा निधी शासनाला परत करण्याच्या सूचना सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिल्या. समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त किती लाभार्थी आहेत. त्यांच्यावर किती खर्च होत आहे, याची माहिती आठ दिवसात देण्याची मागणी सदस्य हिरामण खोसकर यांनी केली. सर्वात महत्वाचे म्हणजे समाजकल्याण विभागाच्या योजनांमधील लाभार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ जमा होत आहे. मात्र जिल्हा बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने या लाभार्थ्यांच्या खात्यात योजनांच्या अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत. अशा लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे पाठपुरावा करून त्यांच्या खात्यात आरटीजीएसने पैसे जमा करून घेण्याची मागणी करावी, अशा सूचना सभापती सुनीता चारोस्कर यांनी केली.