शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

बहारदार नृत्य स्पर्धा रंगली

By admin | Updated: February 17, 2016 23:19 IST

सिन्नर : अभिनेत्री तेजस्वी पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण

सिन्नर : लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने आयोजित लायन्स फेस्टिव्हलचा समारोप बहादार नृत्य स्पर्धेने झाला. पाच दिवस चाललेल्या या फेस्टिव्हलला सुमारे एक लाख नागरिकांनी भेट दिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिन्नर फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लायन्स क्लबने या फेस्टिव्हलदरम्यान बिझिनेस एक्स्पोसह सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. बिझिनेस एक्स्पोमध्ये सुमारे १५० स्टॉल उभारण्यात आले होते. या स्पर्धेला सिन्नरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक अभिनेत्यांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी फेस्टिव्हलला भेट देऊन समाधान व्यक्त केले. वैयक्तिक व समूहनृत्य स्पर्धेने फेस्टिव्हलचा समारोप झाला. प्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री तेजस्वी पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.१२ ते १६ वयोगटातील हर्षाली भामरे, अमिषा देशमुख, अश्विनी रंधे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून बाजी मारली. १७ वर्षांवरील वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रियंका कांबळे, विशाल जाधव व धनश्री राजोळे अव्वल ठरले. १२ ते १६ वयोगटातील दुहेरी गटातून वैशाली मुरुडकर-काजल गांजवे, शुभांगी बोडके-कांचन बोडके, आसावरी भगत-धनश्री भगत यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. १२ ते १६ वयोगटातील समूहनृत्य स्पर्धेत नायगाव जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बाजी मारली. या गटात टेन जेन्स ग्रुप व लोकनेते वाजे विद्यालयाचा संघ अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानावर राहिला. १७ वर्षांवरील समूहनृत्य स्पर्धेत जीएमडी महाविद्यालयाचा ग्रुप अव्वल ठरला. व्ही. के. ग्रुप व जल्लोष ग्रुप यांनी दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. विजेत्यांना अभिनेत्री व प्रसिद्ध नृत्यांगना तेजस्वी पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. नृत्य स्पर्धेचे परीक्षण राजाराम मुंगसे, जावेद शेख, शिल्पा गुजराथी, अपर्णा क्षत्रिय, संगीता कट्यारे यांनी केले. लता गुठुळे यांना विशेष पारितोषिक देण्यात आले. लायन्स फेस्टिव्हल यशस्वी करण्यासाठी क्लबचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, हेमंत वाजे, प्रकल्पप्रमुख मदन लोणारे, जितेंद्र जगताप, हेमंत नाईक, डॉ. विजय लोहारकर, मनीष गुजराथी, डॉ. भरत गारे, किरण कटारिया, डॉ. विष्णू अत्रे, त्र्यंबक खालकर, अरुण थोरात, संजय झगडे, महेंद्र तारगे, कांतीलाल पटेल, राजेंद्र कपोते, डॉ. प्रताप पवार, घनश्याम देशमुख यांच्यासह सभासदांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)