शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून मारहाण; एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:14 IST

रायपूर शिवारात शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोेपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला रवाना केले. त्यांची प्रकृती सुधारत असून, याप्रकरणी चांदवड पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

चांदवड : तालुक्यातील रायपूर शिवारात शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोेपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला रवाना केले. त्यांची प्रकृती सुधारत असून, याप्रकरणी चांदवड पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.रायपूर शिवार भडाणे येथे मनमाड - लासलगाव रस्त्यावर गट नंबर ६०५ या जमिनीवरून श्रीमती नलिनी शेजवळ आणि राजेंद्र निवृत्ती पानपाटील (भाऊ -बहीण) यांच्यात वाद सुरू होते. सदर जमिनीचे खातेवाटप होऊनसुद्धा राजेंद्र पानपाटील यांनी सर्व जमिनीवर कब्जा घेऊन पीक पेरणी केली. याबाबत नलिनी शेजवळ यांच्या बहिणीचा मुलगा भगवान प्रभाकर बोढारे यांना त्यांचे वाटेची जमीन करण्यास सांगितले. त्यानुसार भगवान बोढारे हे शेतात गेले असता दि. ४ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास राजेंद्र पानपाटील व त्यांचा मुलगा किशोर पानपाटील यांनी झाडामागे लपून भगवान बोढारे व त्यांचे काका नामदेव शेजवळ मोटारसायकलवर रस्त्याने जात असताना रस्ता ओलांडताना थांबलेले पाहून मागून येऊन राजेंद्र पानपाटील व किशोर पानपाटील यांनी तलवारीने हल्ला केला, तर बोढारे यांची मुलगी कावेरी बोढारे, पत्नी सुनीता बोढारे हे त्यांना वाचविण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही काठीने वार केले. राजेंद्र पानपाटील यांची पत्नी सुभाबाई व सून दामिनी पानपाटील यांनीदेखील काठीने व कुºहाडीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात भगवान बोढारे यांना गंभीर मार लागल्याने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. चांदवड पोलिसांनी हाणामारीच्या घटनेबाबत गुन्हा दाखल करून राजेंद्र पानपाटील व किशोर पानपाटील यांना अटक केली तर राजेंद्र पानपाटील यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना केले, तर किशोर पानपाटील हा चांदवड पोलीस स्टेशनमध्ये आहे.याबाबत चांदवडचेपोलीस निरीक्षक हिरालालपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र सौंदाणे हे तपास करीत आहेत.दोघांना अटक; एकाची रवानगी कारागृहातचांदवड पोलिसांनी हाणामारीच्या घटनेबाबत गुन्हा दाखल करून राजेंद्र पानपाटील व किशोर पानपाटील यांना अटक केली. राजेंद्र पानपाटील यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना केले, तर किशोर पानपाटील हा चांदवड पोलीस स्टेशनमध्ये आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी