शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना स्प्रेडर नव्हे, कोरोना स्टॉपर व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 13:32 IST

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे आवाहन ओझर : सध्या कोरोना लाट ही पावसातल्या पुराच्या पाण्यासारखी फोफावतेय. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना ...

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे आवाहन

ओझर : सध्या कोरोना लाट ही पावसातल्या पुराच्या पाण्यासारखी फोफावतेय. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना स्प्रेडर नाही, तर कोरोना स्टॉपर व्हावे असे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.शासनाने कडक निर्बंध लागू केल्याने आता संख्या आटोक्यात येण्यास मदत होईल. खरेतर ग्रामीण गावागावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मालेगाव आणि निफाड यात आघाडीवर असताना याला ब्रेक करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच चेन ब्रेक करण्यासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.सध्या तीच आपली प्राथमिकता बनली आहे, असे पाटील यांनी सांगितले. त्यासाठी काही गंभीर बाबी आपणासमोर आणू इच्छितो. घरी क्वारंटईन झालेली लोकं आठवड्याच्या आत बाहेर पडून सुपरस्प्रेडर ठरत आहे. बाधित रुग्ण हा दोन आठवडे निरोगी माणसास संसर्ग पोहोचवू शकतो. मी बरा आहे, मला काही लक्षणं नाही, काहीच त्रास नाही, दम पण लागत नाही, सॅच्युरेशन, ऑक्सिजन लेव्हल नॉर्मल आहे अशी आपल्याच मनाला समाधानी करत सुपर स्प्रेडरची भूमिका बजावतात. प्रशासनाला दोष देण्यापेक्षा आपण मदत कशी करू शकतो हा विचार होणे आता गरजेचे आहे. आपण सुजाण नागरिक असल्याने नियमांचे पालन झालेच पाहिजे. होम क्वारंटाईन रुग्णाने व त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चौदा दिवस घरी राहिलचं पाहिजे. सुपरस्प्रेडर हा आपल्या परिवार व समाजासाठी घातक ठरू पाहत आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी ती काळजी घ्यावी इतकीच अपेक्षा आहे.आमच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कोरोना टेस्ट रिपोर्ट दाखवणे बंधनकारक केले आहे त्याचे कारण ही तितकेच महत्वाचे आहे.आज ग्रामीण भागात हजारो रुग्णांवर उपचार सुरू आहे.येत्या तीस एप्रिल पर्यंत आपल्याला सर्वांना नियम पळून हाच आकडा आटोक्यात आणायचा आहे हे एकच ध्येय मनाशी ठेऊया तसेच एकसंघ होऊन या महामारीशी लढूया. मास्क,सोशल डिस्टनसिंग आणि सॅनिटायझर हे निरोगी जीवनजगण्याचे औषध झाल्याने एकमेकांचा संपर्क टाळा,अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा,मॉर्निंग व इव्हनिंग वॉक पूर्णपणे बंद करा, मुलांना सार्वजनिक ठिकाणी खेळायला सोडू नका, एकमेकांच्या घरी जाणे टाळा,वृध्दांची काळजी घ्या,वेळोवेळी हात धुवा, यासाठी आपले सर्वांचेच सहकार्य असणे स्वाभाविक असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. (१४ सचिन पाटील)