शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘मॉर्निंग वॉक’ला जाताना सावधान...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:52 IST

पंधरवड्यापासून मखमलाबाद शिवारामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. सकाळी किंवा संध्याकाळी बिबट्या या भागात नागरिकांना दर्शन देत आहे. यामुळे ‘मॉर्निंग वॉक’साठी या परिसरात बाहेर पडताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगून सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे आवाहन नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक एस. बी. फुले यांनी केले आहे.

नाशिक : पंधरवड्यापासून मखमलाबाद शिवारामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. सकाळी किंवा संध्याकाळी बिबट्या या भागात नागरिकांना दर्शन देत आहे. यामुळे ‘मॉर्निंग वॉक’साठी या परिसरात बाहेर पडताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगून सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे आवाहन नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक एस. बी. फुले यांनी केले आहे.  मखमलाबाद शिवारातील जगझाप मळा, कोशिरे मळा, गोसावी मळा, मखमलाबाद-रामवाडी रस्त्याचा परिसर, डावा कालवा भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे खात्रीशिर पुरावे वनविभागाच्या गस्त पथकाला आढळून आले आहे. या भागात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे तैनात करण्यात आले आहे. काही भागात ट्रॅप कॅ मेरेदेखील लावण्याची तयारी वनविभागाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. बिबट्या नजरेस पडल्यास त्याला कुठल्याहीप्रकारे असुरक्षिततेची जाणीव होईल, असे कृत्य नागरिकांनी टाळावे. तसेच गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या पथकाला लोकांनी सहकार्य करत योग्य माहिती द्यावी, अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे फुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावाया भागात बिबट्याचा मुक्त संचार हा मोकाट कुत्र्यांच्या आकर्षणापोटीदेखील असू शकतो त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून या भागात सातत्याने मोकाट कु त्र्यांच्या बंदोबस्ताची मोहीम राबविणे गरजेचे आहे.बिबट हा उपलब्ध अधिवासाशी जुळवून घेणारा वन्यप्राणी आहे. कुत्र्यांनादेखील तो खाद्य बनवितो. या भागातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे आवश्यक असल्याचे मत वनविभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केले आहे.डावा कालवा नैसर्गिक ‘कॉरिडोर’महादेवपूर ते थेट मेरीपर्यंत डाव्या कालव्याचा परिसर बिबट्या, तरस, रानमांजर यांसारख्या वन्यजिवांचा ‘कॉरिडोर’ म्हणून ओळखला जातो. शहरापासून लांब व नैसर्गिक लपणचा परिसर म्हणून डाव्या कालव्याची ओळख आहे. गंगापूर धरणापासून सुरू होणारा डावा तट कालवा महादेवपूर, जलालपूर, चांदशी, मखमलाबाद, मेरीमार्गे पुढे जातो. हा परिसर सुरक्षित नैसर्गिक अधिवास ठरतो.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक