शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सावधान ! नवरात्रात गुंड सक्रिय

By admin | Updated: October 18, 2015 22:08 IST

ठिकठिकाणी गुन्हेगारी घटना : महिला, मुलींची छेडछाड, गर्दीत दहशत पसरविण्याचे उद्योग

नाशिक : शहरात नवरात्रोत्सवाची धूम सुरू असताना गुंडांच्यादेखील हालचाली वाढल्या आहेत. सार्वजनिक उत्सवाचे वातावरण बिघडविण्यासाठी शहरातील टवाळखोरांच्या गॅँग सक्रिय झाल्या असून. यामुळे शहरातील शांतता धोक्यात आली आहे. पोलिसांनाही गुंड जुमानत नसल्याने नवरात्रोत्सव धोक्यात आला आहे. राजकीय वर्चस्ववाद आणि दहशत पसरविण्यासाठी शहरात गल्लोगल्ली गुंडांच्या टोळ्या कार्यरत आहेत. कुणाचीही तमा न बाळगणाऱ्या या टवाळांमुळे सर्वाधिक धोका महिला आणि मुलींना निर्माण झाला असून, शाळा, कॉलेज आणि क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थिनींसाठी दररोजी अग्निपरीक्षाच असते. आता तर नवरात्रोत्सव असल्याने दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्या मुलींची छेड काढण्यासाठी हे गुंड नवरात्रोत्सवाच्या भोवती फिरत असतात. या छेडछाडीतून कधी हाणामारीचे तर कधी दहशतीचे वातावरण पसरते. महिला-मुलींची छेड काढणे, एखाद्या तरुणाला घेरून त्यास मारहाण करणे, दांडियाच्या ठिकाणी सुसाट वेगाने दुचाकी चालविणे, उगाचच हॉर्न वाजविणे, जोरात आरोळी ठोकून उगाचच लक्ष वेधून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. दांडिया खेळणार आणि पाहण्यासाठी आलेल्यांनाही यामुळे असुरक्षित वाटू लागले आहे. वास्तविक नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी टवाळखोर शिरणारच नाही किंवा शांतता भंग करणाऱ्यांना लागलीच वठणीवर आणण्यासाठी पोलीस तसेच संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. पुढाऱ्यांनीदेखील त्यांच्या कार्यकर्त्यांना ‘होश’मध्ये राहण्याच्या सूचना देऊन शांतता प्रस्थापित कशी होईल याची काळजी घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी धुडगूस

नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी मद्यपी धुडगूस घालत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. सिडकोत दोन दिवसांपूर्वी मद्यपींनी धिंगाणा घातला होता. शनिवारी जेलरोड येथील दुर्गामाता मंदिरासमोर एका मद्यपीने रस्त्यातच चारचाकी उभी करून ट्रॅफिक अडवून धरली होती. पंचवटीतील क्रांतिनगर येथेही मद्यपींकडून दांडिया खेळणार्‍यांना त्रास दिला जात आहे. राणेनगर, सोमेश्‍वर कॉलनी, इंदिरानगर, पाइपलाइन रोड येथे टवाळांचा उपद्रव वाढला आहे. मुलगा पळविण्याचा प्रयत्न?  

 जेलरोडवरील नारायणबापू नगर चौकात मुलगा पळविण्याचा कथित प्रकार घडला. दोन दिवसांपूर्वी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एक इसम एका नऊ ते दहा वर्षांच्या मुलाला हाताला धरून ओढत असताना तो मुलगा जोरात ओरडत होता. ही बाब चौकात बसलेल्या काही तरुणांच्या लक्षात आली. त्यांनी त्या इसमाला याबाबत विचारणा केली असता तो थोडासा गडबला. ही संधी साधून तो मुलगा त्याचा हात सोडून पळाला आणि पुढे उभे असलेल्या पोलिसांना ही बाब सांगितली. तो इसमही तरुणांच्या हातून निसटला आणि पळत सुटला. त्याच्या मागे पोलीस दुचाकीवरून लागले. तरुणही त्या इसमाच्या मागे लागले आणि अखेर त्यास पकडले. पोलीस पोहोचेपर्यंत तरुणांनी त्या इसमाचा चांगलाच समाचार घेतला होता. नंतर पोलीस त्यास पोलीस ठाण्यात घेऊन गेले. ही घटना परिसरात पसरताच नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. प्रत्येकाला आपल्या मुलांची चिंता आता वाटत असून, पालक आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून आहेत. नवरात्रोत्सवात गावगुंडांचा उपद्रव असताना आता मुले पळविण्याचे प्रकार घडत आहे का? या प्रश्नाने नागरिक चिंतित झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी उपनगर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर प्रकरण रात्रीचे असल्याने दिवसपाळीतील कर्मचार्‍यांना काहीच माहिती नसल्याचे नेहमीचे उत्तर पोलिसांनी दिले.