नाशिक : चांदवड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस उपनिरीक्षकास सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पडकले आहे. चांदवड येथे मोटारसायकलचा अपघात झाला होता. त्यातील जखमीस चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारदाराने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव रूपला यांनी वाहनांची कागदपत्रे पोलीस ठाण्यात जमा केली होती.ती कागदपत्रे परत देण्यासाठी व मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करू नये यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांनी त्यांच्याकडे सात हजार रुपयाची मागणी केली. चांदवड पोलीस ठाण्याच्या बाहेरील एका हॉटेलमध्ये खासगी व्यक्तीमार्फत संशयित बाळू चिंंतामण निरभवणे यांना सात हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पडकले. (वार्ताहर)
लाच स्वीकारणाऱ्या पोलिसाला अटक
By admin | Updated: October 2, 2014 00:34 IST