शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

‘सामूहिक विवाह’ समाजाच्या प्रगतीचा आधार

By admin | Updated: December 27, 2015 23:05 IST

मोईनुद्दीन अशरफी : अकरा मुस्लीम जोडप्यांचा थाटामाटात ‘निकाह’

नाशिक : मुला-मुलींचा विवाह हा पालकांचा सर्वाधिक चिंतेचा विषय बनत चालला असून, वाढत्या महागाईबरोबरच विवाहसमारंभात होणारा चंगळवादावरील खर्च बघून गोरगरीब कुटुंब धसका घेत आहे. त्यामुळे ‘सामूहिक विवाह’चे उपक्रम काळाची गरज असून, समाजाच्या प्रगतीसाठी उत्तम आधार आहे, असे प्रतिपादन मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना हजरत सय्यद मोईनुद्दीन अशरफी यांनी केले.युवा आदर्श मल्टीपर्पज सोशल गु्रपच्या वतीने जुने नाशिकमधील कथडा परिसरात आयोजित सामूहिक विवाह (इज्तेमाई शादियॉँ) सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अशरफी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सामूहिक विवाह ही संकल्पना अत्यंत गरजेची व समाजभिमुख आहे. युवकवर्गाने यासाठी मागील तीन वर्षांपासून घेतलेला पुढाकारदेखील कौतुकास्पद आहे. शहरात वर्षभरातून दोन संस्थांमार्फ त उपक्रम राबविला जातो हे या शहराचे मुख्य वैशिष्ट. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, मीर मुख्तार अशरफी, बबन घोलप, हज समितीचे राज्याचे अध्यक्ष इब्राहीम शेख, हाजी अरफात, नगरसेवक गुलजार कोकणी, सलीम शेख, संस्थेचे अध्यक्ष बबलू शेख आदि मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)