शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यांपासून बॅरिकेड्स पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:15 IST

पिंपळगाव बसवंत : लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिंडोरी व नाशिक मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली होती. मात्र, आता सभेला दीड महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतरही पोलीस यंत्रणेला त्यांनी सभास्थळी टाकलेले बॅरिकेड्स उचलून नेता आलेले नाही. त्यामुळे सदर बॅरिकेड्स अस्ताव्यस्त पडले असून, काही चोरीलाही गेल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देबेफिकीर पोलीस यंत्रणा : रस्त्यावर अपघाताची शक्यता

पिंपळगाव बसवंत : लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिंडोरी व नाशिक मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली होती. मात्र, आता सभेला दीड महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतरही पोलीस यंत्रणेला त्यांनी सभास्थळी टाकलेले बॅरिकेड्स उचलून नेता आलेले नाही. त्यामुळे सदर बॅरिकेड्स अस्ताव्यस्त पडले असून, काही चोरीलाही गेल्याची चर्चा आहे.लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे दि. २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जाहीर सभा झाली होती. या सभेची सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. सदर विशाल जागेत सापांचा वावर असल्याने पोलीस प्रशासनाने सर्पमित्रांची फौज तैनात केली होती. शिवाय पंतप्रधानांची सभा म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाय योजले होते. मोदींच्या सभेआधीच पाच दिवस शेकडो लोखंडी बॅरिकेड लावण्यात आले होते. सदर बॅरिकेड्स जिल्हा भरातून आणण्यात आले होते. मात्र आता सभा होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी सभास्थळी सदर बॅरिकेड्स बेवारस स्थितीत पडून असून, पोलीस यंत्रणेला ते अद्याप उचलून नेण्यात वेळ मिळालेला नाही.त्यामुळे बरेच बॅरिकेड्स रस्त्यावर येऊन पडल्याने अपघातही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर काही बॅरिकेड्स चोरीला गेले असल्याचीही चर्चा आहे. अपघातात एकाचा बळीपोलिसांनी सभास्थळी लावलेल्या याच बॅरिकेड्समुळे पंधरा दिवसांपूर्वी प्रकाश दिवरे या व्यक्तीचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. तरीही पोलीस प्रशासनाने अजूनही बॅरिकेड्सबाबतीत दखल न घेतल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.