शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गालगतचे ढाबे बनले बार

By admin | Updated: April 14, 2017 00:44 IST

पाचशे मीटर अंतरावरील हॉटेलमध्ये मद्य पिण्यास, विकण्यास बंदीचा परिणाम

नरेंद्र दंडगव्हाळ  : सिडकोएकीकडे शासनाने महामार्गाच्या पाचशे मीटर अंतरावरील हॉटेलमध्ये मद्यविक्री करण्यास व मद्य पिण्यास बंदी घातली आहे. तसेच मद्यविक्रीच्या दुकानांनादेखील बंदी घातली असली तरी दुसरीकडे मात्र महामार्गालगतच असलेल्या बहुतांशी ढाब्यांवर विनापरवाना मद्य पिण्याची मुभा असल्याने हॉटेलमधील गर्दी कमी झाली असली तरी ढाबे मात्र फुल्ल असल्याने ढाबेच बार बनल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.शासनाने महामार्गाच्या पाचशे मीटर अंतरावरील हॉटेलमध्ये मद्यविक्री करण्यास व मद्य पिण्यास बंदी घातली असल्याने महामार्गालगतची शेकडो हॉटेल्स बंद अवस्थेत दिसत आहे. यात महामार्गालगतच्या अनेक हॉटेलमध्ये जेवणाव्यतिरिक्त मद्यपी हे केवळ मद्य पिण्यासाठीच जात असल्याने आज बहुतांशी हॉटेल्स बंद अवस्थेत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. महामार्गालगतच्या हॉटेलबरोबरच मद्यविक्रीची दुकानेही बंद करण्यात आल्याने याचा फायदा मात्र पाचशे मीटरपेक्षा दूरवर असलेल्या हॉटेलचालकांना झाला आहे. यात काही हॉटेल्समध्ये गर्दी होत नव्हती असे हॉटेलदेखील फुल्ल होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच अंबड येथील दत्तनगर भागात नागरी वस्तीत असलेले एक बिअर शॉपी असलेले दुकान परिसरातील महिलांनी बंद पाडले. अजूनही अंबडमधील काही भागांत विनापरवाना मद्यविक्री सुरू असल्याचे यावेळी नागरिकांनी पोलिसांना सांगितले.एकीकडे महामार्गालगत मद्यविक्री तसेच पिण्यास बंदी घातली असली तरी दुसरीकडे मात्र महामार्गालतच असलेल्या ढाब्यांवर मात्र मद्य पिण्यास परवानगी असल्याने ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या ढाब्यांना केवळ जेवणासाठी परवानगी असून, याठिकाणी कोणीही विनापरवाना मद्यविक्री तसेच मद्य पिण्यास मनाई असताना मात्र सर्व नियम मोडत या ंिंठकाणी व्यवसाय केला जात आहे. महामार्गालगतच्या हॉटेलमध्ये मद्य पिण्यास परवानगी नसल्याने ढाब्यांवर गर्दी होत आहे. तसेच मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या छोटेखानी टपऱ्यांवरदेखील रात्रीच्या सुमारास मद्यपे्रमींची गर्दी होते. याबरोबरच महामार्गालगत असणारे पेट्रोलपंप व गॅरेज याठिकाणी सर्रासपणे ट्रकचालक मद्य पित असल्याचे चित्र बघावयास मिळते.