शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!

By admin | Updated: September 15, 2016 01:01 IST

आज विसर्जन : दशदिनाच्या मंगलमय उत्सवाची सांगता; प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी

नाशिक : विघ्नहर्त्या गणरायाच्या दशदिनाच्या मंगलमय उत्सवाची सांगता गुरुवारी (दि. १५) अनंत चतुर्दशीला होत आहे. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पाला निरोप देण्याचा क्षण समीप येऊन ठेपल्याने गणेशभक्त विसर्जनाच्या तयारीत गुंतले आहेत. ‘बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या’, असे म्हणत गणेशभक्त भावपूर्ण वातावरणात वाजत-गाजत मिरवणुकीने जाऊन लाडक्या बाप्पाला निरोप देतील. त्यासाठी महापालिकेच्या वतीने विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. शहरात विसर्जनस्थळी चोख व्यवस्था तैनात ठेवण्याबरोबरच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी सुमारे २९ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने दहा दिवस वातावरण चैतन्याने भारलेले होते. गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळांनी साकारलेल्या चित्तवेधक आरास पाहण्यासाठी रस्त्यांवर गणेशभक्तांचा महापूर सारखा वाहत होता. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा मंडळाच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. यंदा दरवर्षीप्रमाणे पौराणिक, धार्मिक देखाव्यांवर अधिक भर राहिला तर प्रबोधनपर देखाव्यांनीही नाशिककरांकडून दाद मिळविली. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आता बाप्पाला निरोप देण्याचा क्षण समीप येऊन ठेपला आहे. यंदा शाडूमातीच्या गणपती मूर्तींची मोठ्या प्रमाणावर प्रतिष्ठापना झाल्याने पर्यावरणपूरक विसर्जनालाही गणेशभक्तांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. शहर गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग : नाशिक शहरातील मुख्य मिरवणुकीला गुरुवारी (दि.१५) दुपारी साधारणत: चार वाजेपासून वाकडी बारव (चौक मंडई) येथून सुरुवात होईल़ ही मिरवणूक जहांगिर मशीद - दादासाहेब फाळके रोड - महात्मा फुले मार्केट - बादशाही लॉज कॉर्नर - विजयानंद थिएटर - गाडगेमहाराज पुतळा - गो़ ह़ देशपांडे पथ - धुमाळ पॉइंट - सांगली बँक सिग्नल - महात्मा गांधी रोड - मेहेर सिग्नल - स्वामी विवेकानंद रोड - अशोकस्तंभ - नवीन तांबट आळी - रविवार कारंजा - होळकर पूल - मालेगाव स्टॅण्ड - पंचवटी कारंजा - मालवीय चौक - परशुराम पुरिया रोड - कपालेश्वर मंदिर - भाजीबाजार - म्हसोबा पटांगणावरून विसर्जन ठिकाणी जाणार आहे़ वाहतुकीतील बदल : या कालावधीत निमाणी बसस्थानकातून पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस या पंचवटी डेपोतून सुटतील तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहर व इतर ठिकाणी जातील, तर पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका सर्कल कन्नमवार पुलावरून जातील़ रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस शालिमार येथून सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील़जेलरोड विभाग : नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक व सैलानीबाबा चौक ते नांदूर नाका हा मार्ग दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी चार वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे़ या काळात नाशिकरोड विभागातील नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक या मार्गाने जाणारी वाहने ही नांदूर नाका औरंगाबाद रोडने तपोवनातील स्वामी जनार्दन पूलमार्गे जातील व त्याच मार्गाने येतील़ वाहतूक मार्गातील बदल पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलातील वाहने व या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी लागू राहणार नाही.नाशिकरोड गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग : नाशिकरोडला बिटको चौकातून मिरवणूक निघणार असून, दुपारी चार ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्गावरील बदलाची अंमलबजावणी केली जाणार आहे़ बिटको चौकातून सुरू झालेली मिरवणूक शिवाजी महाराज पुतळा - देवी चौक - रेल्वेस्टेशन पोलीस चौकी - सुभाषरोड - सत्कार पॉइंट - देवळालीगाव गांधी पुतळा - खोडदे किराणा दुकान ते वालदेवी नदी देवळालीगावपर्यंत जाणार आहे़