शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याच ग्राहकांना पैसे देण्यावर बॅँकांचा भर

By admin | Updated: April 23, 2017 02:40 IST

नाशिक : रिझर्व्ह बॅँकेकडून पुरेसे चलन मिळत नसल्याने खातेदार नाराज होत असल्याने आता बॅँकांनी एटीएमऐवजी बॅँकेतून रोख रक्कम देण्यास सुरुवात केली आहे

नाशिक : गेल्या पंधरवड्यापासून नोटांअभावी बॅँकिंग व्यवहारावर परिणाम झाले असून, रिझर्व्ह बॅँकेकडून पुरेसे चलन मिळत नसल्याने खातेदार नाराज होत असल्याने त्यावर उपाय म्हणून आता बॅँकांनी एटीएमच्या माध्यमातून पैसे देण्याऐवजी बॅँकेतून रोख रक्कम देण्यास सुरुवात केली आहे. अन्य बॅँकांचे एटीएम कार्डधारक एटीएममधून पैसे काढून नेत असल्याने मूळ खातेदार त्यापासून वंचित राहत असल्यामुळेच बॅँकांनी हे पाऊल उचलले असून, शहरातील एटीएममध्ये पैशांच्या खडखडाटीमागे हेदेखील एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.कोअर बॅँकिंग प्रणालीमुळे कोणत्याही बॅँकेचा एटीएम कार्डधारक कोणत्याही बॅँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतो. अगदी केंद्र सरकारने नोटाबंदी लादल्यानंतरही सर्वच बॅँकांच्या एटीएमच्या बाहेर ग्राहकांनी गर्दी केली होती. खातेदारांकडून थेट बॅँकेत जाऊन पैसे काढण्यापेक्षा एटीएममधून पैसे काढण्याला अधिक प्राधान्य दिले जाते ही वस्तुस्थिती असल्याने आजही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहक जात असले तरी, नोटांअभावी एटीएम बंद आहेत. रिझर्व्ह बॅँकेकडून चलन मिळत नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिक शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातही बॅँका व एटीएमच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे. जवळपास ७० टक्के एटीएम नोटांअभावी बंद असून, सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकांची चेस्ट बॅँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बॅँकेलाही त्याची झळ बसली आहे. पैशांअभावी बॅँकांची पतही धोक्यात आल्याने खातेदार टिकवून ठेवण्याच्या स्पर्धेमुळे बॅँकांनी फक्त आपल्याच ग्राहकांना सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहरातील बहुतांशी बॅँकांच्या एटीएममध्ये नोटांचा खडखडाट असून, ज्या बॅँकांचे एटीएम बंद आहेत, त्या बॅँकांनी आपल्या खातेदारांसाठी बॅँकेत पैशांची सोय केली आहे. कारण दुसऱ्या बॅँकेच्या खातेदारांकडून एटीएमचा वापर होऊन पैसे काढून घेतले जात असल्याचे बॅँकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)