शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक काळात बॅँकांनी व्यवहारांची माहिती सादर करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 01:05 IST

निवडणूक काळात बँकांनी बँकेत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील ठेवणे आवश्यक असून, संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक शाखेस सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

नाशिक : निवडणूक काळात बँकांनी बँकेत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील ठेवणे आवश्यक असून, संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक शाखेस सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवडणूक खर्चाबाबतच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मांढरे पुढे म्हणाले, निवडणूक आचारसंहिता कालावधीत बँक खात्यातून आरटीजीद्वारे एका बँक खात्यातून अनेक व्यक्तींच्या खात्यात जमा होण्यावरही बँकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खातेदाराच्या किंवा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या खात्यात जमा करणे किंवा काढणे यासाठी संबंधित खातेदाराने प्रतिज्ञापत्र बँकेकडे सादर करणे गरजेचे आहे.निवडणूक काळात अवैध रोकड नियंत्रणासाठी भारत निवडणूक आयोग आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार एटीएम मशीन्समध्ये रोकड जमा करताना वाहतुकीसाठी विहित कार्यप्रणालीनुसार वापर करावा. तसेच निवडणूक काळात खासगी विमान, हेलिकॉप्टर यांची सेवा पुरविताना नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवाशाच्या बॅगेची तपासणी करावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आयकर विभागाने या प्रकरणी तत्काळ प्रतिसाद यंत्रणा निर्माण केली आहे. बँकांनी त्यांच्या व्यवहाराच्या वापरासाठी उपयोगात आणावयाच्या रोखीच्या व्यवहारासाठी लागणाºया रोकड रकमेसाठी वाहतुकीसाठी उपयोगात येणाºया वाहनांबाबत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या मार्गदर्शन सूचनांची कटाक्षाने अंमलबजावणी करावी.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर,  आयकर विभागाचे सहसंचालक अमित सिंग, उपायुक्त आयकर  मनोज सिन्हा, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक चरणसिंग  राजपूत, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक बी. व्ही. बर्वे आदी उपस्थित होते. आयकर विभागास कळविण्याच्या सूचनानिवडणूक कालावधीत राजकीय पक्षांकडून एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा करणे किंवा काढणे तसेच उमेदवारांच्या खात्यातून १० लाखांहून अधिक रोख रक्कम काढणे किंवा जमा करण्याची माहिती मिळाल्यास त्यासंदर्भात आयकर विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे, अशा सूचनाही मांढरे यांनी दिल्या.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय