शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

संमेलनाच्या निधीसाठी आता बँका ‘रडारवर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:27 IST

नाशिक : साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी लागणाऱ्या निधीसाठी आमदार, खासदार आणि नगरसेवक यांच्याकडून निधीसाठीची ‘फिल्डिंग’ लावल्यानंतर आता आयोजकांनी त्यांचा मोर्चा ...

नाशिक : साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी लागणाऱ्या निधीसाठी आमदार, खासदार आणि नगरसेवक यांच्याकडून निधीसाठीची ‘फिल्डिंग’ लावल्यानंतर आता आयोजकांनी त्यांचा मोर्चा जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांकडे वळवला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील एका प्रख्यात ‘बँकर’कडेच ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आधीच ‘एनपीए’ग्रस्त झालेल्या बँकांना हे ‘सांस्कृतिक औदार्य’ दाखवणे शक्य नसूनही काहीतरी उसने अवसान आणून ‘योगदान’ देण्याची गळ घातली जात असल्याची चर्चा घडू लागली आहे.

साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी प्रारंभी २ कोटींपर्यंत ठरविण्यात आलेले बजेट आता वाढत जाऊन ४ कोटींपर्यंत लागणार असल्याचा आयोजकांचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाकडून प्राप्त रक्कम, लोकप्रतिनिधींकडून मिळणारी प्रस्तावित रक्कम, स्थानिक उद्योजक, व्यावसायिकांनी दिलेली देणगी, नाशिककरांनी दिलेले योगदान, स्टॉल्स उभारणीतून मिळणारा निधी, अडीच कोटींहून अधिक निधी उभारणी पूर्ण झाली आहे. मात्र, सुधारित प्रस्तावानुसार आता संमेलनासाठीचे आर्थिक लक्ष्य हे ४ कोटींवर जाऊन पाेहोचले आहे. त्यामुळे उर्वरित निधीची पूर्तता कशी करायची, याबाबतची काळजी आयोजकांना वाटत होती. त्यासाठी मग गावोगाव फिरून निधी गोळा करणे, समित्यांमधील सदस्यांना पावती फाडण्यास सांगणे यांसह विविध पर्यायांचा अवलंब करण्यात येत आहे. मात्र, तेवढ्यावरदेखील अपेक्षित निधीचे लक्ष्य गाठणे शक्य होणार नसल्याचे आयोजकांच्या लक्षात आले. त्यामुळेच संमेलनाच्या मुख्य कार्यकारिणीतील प्रमुख आणि समिती प्रमुखांनी मिळून कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या जिल्ह्यातील बँकांकडून संमेलनासाठी ‘योगदान’ मिळवण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अनेक नागरी सहकारी बँका, पतसंस्थांचे संस्थापक, अध्यक्ष आणि सर्वेसर्वा असणाऱ्यांना अनौपचारिक भेटीची निमंत्रणे गेली. या मान्यवरांना संबंधितांनी भेटीचे कारणही सांगितले न गेल्याने ते बुचकळ्यात पडले. मात्र, एकमेकांशी संपर्क झाल्यानंतर त्या कारणाचा त्यांना उलगडा झाला. त्यातदेखील ज्यांच्याकडून निमंत्रण गेले ते टाळता येण्याजोगे व्यक्तिमत्त्व नसल्याने संबंधित बँकांचे प्रमुख निर्धारित ठिकाणी पोहोचल्यानंतर विषय उलगडला गेला.

इन्फो

तब्बल १० लाखांचे ‘टार्गेट’

काही मोठ्या नागरी बँकांच्या प्रमुखांना संमेलन निधीसाठी विचारणा करण्यात आली. मात्र, एनपीए आणि अन्य आर्थिक समस्यांचा पाढा त्यांनी वाचल्याचे समजते. तरीदेखील किमान १० लाखांचे सांस्कृतिक औदार्य दाखवण्याचे आवाहन करून त्यांना एकप्रकारे तेवढे टार्गेटच देण्यात आले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित बँक प्रमुखांची ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशीच अवस्था झाल्याचे बोलले जात आहे.

लोगो

साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.