शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

बँकेची मनमानी : दोन हजारांत लग्नाचा खर्च भागवायचा कसा? जिल्हा बँकेच्या शाखेला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:22 IST

आडगाव : जिल्हा बँकेच्या आडगाव शाखेत लाखो रुपयांची रक्कम खात्यावर जमा असताना अवघे दोन हजार रुपये मिळत असून, चकरा माराव्या लागत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.५) सकाळी आडगाव शाखेला टाळे ठोकून आंदोलन केले.

ठळक मुद्देसर्व खात्यांवर २० कोटी रुपयांच्या ठेवी आहेतरिकाम्या हाती परत जायचे यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत

आडगाव : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आडगाव शाखेत जवळपास वर्षभरापासून लाखो रुपयांची रक्कम खात्यावर जमा असताना अवघे दोन हजार रुपये मिळत असून, स्वत:चे पैसे मिळवण्यासाठी बँकेत रोज चकरा माराव्या लागत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.५) सकाळी आडगाव शाखेला टाळे ठोकून आंदोलन केले. आंदोलकांनी प्रवेशद्वाराला कुलूप लावून तेथेच ठिय्या मांडत आंदोलन केले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आडगाव परिसरासह विंचूर गवळी या पंचक्रोशीतील शेतकºयांचे खाते आहे. या शाखेत चार हजार खातेदार असून सर्व खात्यांवर २० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. मागील वर्षभरापासून पीककर्जही मिळालेले नाही. शिवाय आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी शेतकरी खातेदार बँकेत चकरा मारत आहेत. सकाळी बँकेत यायचे, हेड आॅफिसवरून कॅश येण्याची वाट बघायची, पैसे मिळाले तर ठीक नाही तर रिकाम्या हाती परत जायचे यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. शेती कामांसाठी, मजुरीसाठी, लग्नकार्यासाठी वेळप्रसंगी पोटाला पिळ देऊन जमा केलेली हक्काची रक्कमदेखील मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. महिना पंधरा दिवसांत दोन हजार रु पये मिळतात. त्यासाठीदेखील आपली सर्व कामे बाजूला ठेवून बँकेत ठिय्या द्यावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी व खातेदारांनी बँकेच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी आडगाव शाखेला टाळे ठोकून आंदोलन केले. बँकेत पैसे येत नाही तोपर्यंत कुलूप उघडू देणार नाही, असा पवित्रा घेत नगरसेविका तथा विधी सभापती शीतल माळोदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व ठेवीदारांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. त्यावेळी बँक कर्मचाºयांकडून पाच हजार रु पये आठवड्याला देण्याचे तोंडी आश्वासन दिल्यानंतर ११.४५ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. त्यावेळी पोलीस पाटील एकनाथ मते, नितीन माळोदे, पोपट लभडे, त्र्यंबक शिंदे, युवराज माळोदे, प्रकाश शिंदे, अशोक माळोदे, संदीप माळोदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आंदोलन मागे घेतल्यानंतर बँकेत पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी पहायला मिळाली.