शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बँकांचे रविवारीही कामकाज

By admin | Updated: March 27, 2017 00:34 IST

नाशिक : रिझर्व्ह बँकने २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान देशातील सर्व खासगी आणि सरकारी बँका खुल्या ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर शहरातील सरकारी बँकांसह काही खासगी बँकांनीही रविवारी दिवसभर कामकाज सुरू ठेवले.

नाशिक : भारतीय रिझर्व्ह बँकने येत्या २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान देशातील सर्व खासगी आणि सरकारी बँका खुल्या ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर शहरातील सरकारी बँकांसह काही खासगी बँकांनीही शनिवारी, रविवारी दिवसभर कामकाज सुरू ठेवले. ज्या बँकांमध्ये शासकीय कर भरणा व अन्य आर्थिक व्यवहार करण्यास परवानगी आहे, अशाच बँकांनी रविवारी कामकाज केले असून, त्यासाठी कर्मचारी वर्गही मर्यादित असल्याने रोज होणारे कोणतेही सर्वसाधारण व्यवहार झाले नाही. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या आपल्या प्रसिद्धीपत्रात येत्या २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान येणाऱ्या सर्व सार्वजनिक सुट्या रद्द करून बँक ग्राहकांसाठी सुरू ठेवा असे निर्देश सर्व बँकांना दिले आहेत. आरबीआयच्या या निर्णयाला देशातील अनेक बँकांनी होकार दर्शवत शनिवारी व रविवारीही बँका सुरू ठेवण्याचे आदेश प्रत्येक शाखेला दिले असले तरी बहुतांशी बँकांच्या सरकारी कर भरण्याचे अथवा इतर व्यवहार करणाऱ्या शाखा सुरू असल्याचे दिसून आले. यात स्टेट बँके च्या शनिवारी सर्व १४ शाखा सुरू होत्या, तर रविवारी १० ते १२ शाखाच सुरू राहिल्या. बँक आॅफ महाराष्ट्रच्याही १८ ते १६ शाखा सुरू होत्या, तर खासगी बँकांच्या मात्र केवळ सरकारी करभरण्याचे व अन्य कामकाज करणाऱ्या शाखाच सुरू असल्याचे दिसून आले. दरम्यान, बँका शनिवार-रविवारी सुरू असल्याने रोखीचे व्यवहार करणारे ग्राहकच बँकांमध्ये येत नसल्याने काही बँकांनी अर्धवट शटर बंद करून काम केले, तर काही बँकांचे पूर्ण शटर खाली करून सर्वसाधारण वापराचा दरवाजा सुरू ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)गतवर्षी सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे देशात कॅशलेस व्यवहार मोठ्याप्रमाणत झाले आहेत. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षासाठी देशातील रोखीच्या व्यवहारांबरोबरच आॅनलाइन व्यवहारांचीही माहिती बँकांजवळ असणे महत्त्वाचे आहे. ४नागरिकांनी केलेल्या सर्व आॅनलाइन व्यवहारांची सर्व माहिती व्यवस्थितरीत्या मांडण्यासाठी तसेच नागरिकांनाही मार्च महिन्याच्या शेवटी आपले सर्व आर्थिक व्यवहार व्यवस्थितरीत्या पूर्ण करता यावेत यासाठी १ एप्रिलपर्यंत बँका खुल्या ठेवण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत.