ठराविक मार्गावरच होतेय टोईंग
नाशिक : शहरात सर्वत्र वाहतूक कोंडीमुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असतांना टोईंगकडून शहरातील ठराविक मार्गावरच कारवाई केली जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर परिसरातच मोहीम राबविली जात आहे. मुख्य बाजारपेठेतील मार्गांवर दुतर्फा वाहने उभी केली जात असतांना त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
प्रभाग ३१ मध्ये मतदार नोंदणी अभियान
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रभाग ३१ मध्ये मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे असे नवमतदार नोंदणी करण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर ज्यांचे नाव यादीत आलेले नाही अशा मतदारांची नोंदणी या मोहिमेत करण्यात आली. यावेळी मकरंद सोमवंशी, प्रशांत नसले, सुरेखा काळे, अविनाश माळी, प्रशांत पुंड आदी उपस्थित होते.
उपनगरच्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
नाशिक : उपनगर येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र शिक्षक सेनेच्या माध्यमातून या उपक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वृक्षांच्या संवर्धनासाठी पालकत्वदेखील स्वीकारण्यात आले.
विभागीय आयुक्तालयाबाहेर वाढले पार्किंग
नाशिक : नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयासमोरील मार्गावर वाहनांचे पार्किंग वाढले आहे. आयुक्तालयाच्या आवारात अनेक कार्यालये असून या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातून अनेक लोक कामानिमित्ताने येत असतात. शिवाय अनेक दुकाने या ठिकाणी असल्याने वाहने रस्त्याच्या कडेलाच पार्किंग केली जात आहेत.