शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून ६५ लाखांचा अपहार

By admin | Updated: November 26, 2015 23:04 IST

बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून ६५ लाखांचा अपहार

नाशिक : बँकेतील खात्याचा पासवर्ड हॅक करून चोरट्यांनी नाशिकमधील एका व्यावसायिकाच्या बँक खात्यातून तब्बल ६५ लाख रुपये स्वत:च्या विविध बँक खात्यांत वर्ग करून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश प्रकाश बदलानी (३७, पूनम अपार्टमेंट, राका कॉलनी) यांचे बँक आॅफ इंडियामध्ये खाते आहे़ संशयिताने बदलानी यांच्या बँक खात्यात समाविष्ट केलेला मोबाइल नंबर ९३७३९०११९१ हा बंद केला व याच नंबरचे दुसरे सीमकार्ड घेतले़या सीमकार्डवरील नंबर संगणकावर टाकून बदलानी यांच्या बँक खात्याची सर्व माहिती मिळवून पासवर्ड हॅक केला़ यानंतर संशयिताने बदलानी यांच्या बँक खात्यात असलेली ६५ लाख दहा हजार रुपयांची रक्कम स्वत:च्या आयसीआयसीआय बँक सांताक्रुझ (मुंबई), विजया बँक (मुंबई), एचडीएफसी बँक (गोमतीनगर, उत्तर प्रदेश) या खात्यावर वर्ग करून फसवणूक केली़बदलानी हे नेहमीप्रमाणे बँकेत गेले असता खात्यातील मोठी रक्कम वर्ग झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी बँक प्रशासनाकडे तक्रार केली असता त्यांनी तांत्रिक बाब असल्याने पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला़ या प्रकरणी बदलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात आयटी अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़