शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

‘कमवा आणि शिका’ योजनेला अडसर

By admin | Updated: April 27, 2016 00:03 IST

सोमेश दासगुप्ता : मुक्त विद्यापीठाच्या योजनेवर पाणी

सातपूर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व निपम यांच्या संयुक्त विद्यमाने कमवा आणि शिका ही योजना कायदेशीर अडचणींमुळे नाशिकला राबविता येणार नाही. मात्र निपमचे मुख्यालय असलेल्या कोलकाता येथे या योजनेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती निपमचे राष्ट्रीय अध्यक्ष सोमेश दासगुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.नाशिक ही अतिशय महत्त्वाची शाखा आहे. नाशिक शाखा आणि मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शिका आणि कमवा हा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव होता. याकडे लक्ष वेधले असता संस्थेच्या नावात राष्ट्रीय (नॅशनल) नाव असल्याने कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. संस्थेचे कार्य संपूर्ण भारतात चालते, तर देशात १४ मुक्त विद्यापीठे असून, त्या त्या राज्यात कायदे वेगवेगळे आहेत. त्यामुळे नाशिकला हा प्रकल्प शक्य नाही, परंतु संस्थेचे मुख्यालय असलेले कोलकाता येथे हा प्रकल्प राबविणे शक्य असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. कारण तेथील मुक्त विद्यपीठाचे कुलगुरू हे निपमचे माजी अध्यक्ष असल्याने या प्रकल्पाचा विचार होऊ शकतो, असे दासगुप्ता यांनी स्पष्ट केले. यावेळी निपम नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र चौबळ, श्रीधर व्यवहारे, डॉ.उदय खरोटे, प्रकाश बारी, एस. एस. खैरनार, सुधीर पाटील, राजेंद्र रसाळ, राजाराम कासार आदिंसह संचालक उपस्थित होते. (वार्ताहर)