शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेमोसमी पावसाने नाशिकमध्ये गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 12:23 IST

नाशिक- कडक हिवाळा सुरु असताना राज्यभर ठिकठिकाणी झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही सोमवारी(दि.२०) सकाळी सुमारे दोन तास पावसाचा शिडकावा झाला. अनपेक्षीतपणे आलेल्या पावसामुळे छत्री, रेनकोटअभावी कंपनी, कार्यालयांमध्ये निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. पावसाला जोर नसला सातत्याने दोन तास सुरु असलेल्या रिमझिम सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. सकाळ ...

नाशिक- कडक हिवाळा सुरु असताना राज्यभर ठिकठिकाणी झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही सोमवारी(दि.२०) सकाळी सुमारे दोन तास पावसाचा शिडकावा झाला. अनपेक्षीतपणे आलेल्या पावसामुळे छत्री, रेनकोटअभावी कंपनी, कार्यालयांमध्ये निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. पावसाला जोर नसला सातत्याने दोन तास सुरु असलेल्या रिमझिम सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. सकाळ होऊनही सुर्यदेवतेचे दर्शन न झाल्याने जवळपास कुठेतरी पाऊस झाल्याचे संकेत मिळत होते. सकाळी ११ च्या दरम्यान शहरात सिडको, सातपूर, नाशिकरोड, मेनरोड, कॉलेजरोड, गंगापूर रोड, पंचवटी आदि जवळपास सर्वच भागात पावसाला सुरवात झाली. चाकरमान्यांबरोबरच शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले तर रस्त्यावर बसून भाज्या, फळे, गृहपयोगी वस्तू आदि विकणाºया छोट्या विक्रेत्यांचीही गैरसोय झाली. बाजारपेठांमधील अनेक दुकानदारांनी दुकाने बंद ठेवत गारव्याचे घरीच बसून रहाणे पसंत केल्याचे दिसत होते. गारव्यामुळे चहाच्या टपºयांवर ग्राहकांची गर्दी झालेली पहायला मिळाली, तर काहींनी गरमागरम भजे, वडे, सुप आदिंचा आस्वाद घेण्यास पसंती दिली. पावसामुळे अनेक पालकांनी मुलांना शाळेतच न पाठवण्याचा निर्णय घेतला. बेमोसमी पावसामुळे नाशिककरांची दाणादाण उडालेली पहायला मिळाली.