जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाळू बुल्हे यांची निवड झाली. आवर्तन पद्धतीने भिकुबाई आजगे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर मंगळवारी (दि.१६) लोकनियुक्त सरपंच मोहनबाई बुल्हे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.निवडणूक निर्णय अधिकारी भास्कर बागूल यांनी दिलेल्या वेळेत उपसरपंच पदासाठी सोमनाथ दगू कानडे व बाळू पंढरीनाथ बुल्हे यांचे अर्ज दाखल झाले. त्यानंतर घेण्यात आलेल्या मतदानात बाळू बुल्हे यांना सहा मते तर सोमनाथ कानडे यांना चार मते मिळाल्यामुळे बाळू बुल्हे यांना निवडणूक निर्णय अधिकारी बागूल यांनी विजयी घोषित केले.यावेळी दुर्गा हांडोरे, भिकुबाई आजगे, ठकुबाई बुटे, प्रकाश कुऱ्हाडे, कारभारी वाघ, मंदा बुल्हे, लिलाबाई कानडे, सचिन अजगे आदी सदस्य उपस्थित होते.