शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा रस्त्यावर

By admin | Updated: June 2, 2017 00:41 IST

नाशिक : कर्जमाफी तसेच स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला गुरुवारी निफाड, येवला, सटाणा व दिंडोरी या तालुक्यांमध्ये हिंसक वळण लागले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कर्जमाफी तसेच स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला गुरुवारी निफाड, येवला, सटाणा व दिंडोरी या तालुक्यांमध्ये हिंसक वळण लागले. मुंबईकडे तसेच बाजार समित्यांमध्ये जाणारा शेतमाल, दूध तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर ओतण्यात आला, तर काही ठिकाणी तो पेटविण्यातही आला. संपाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको तसेच चक्का जाम आंदोलनेही केली. येवल्यात संतप्त शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक शेतकरी जखमी झाल्याचीही घटना घडली.येवल्यात शेतकरी संपाने हिंसक वळण घेतल्याने दूध, भाजीपाल्यासह अनेक जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या मालाची वाहने ठिकठिकाणी अडवून माल रस्त्यावर फेकण्यात आला. अनेक ठिकाणी दूध ओतून सरकारच्या शेतकरीविरोधी नीतीचा निषेध करण्यात आला. बागलाण तालुक्यात सटाणा शहर, करंजाड येथे रास्ता रोको करून शेतमाल रस्त्यावर फेकल्याने एकच गोंधळ उडाला तर मालट्रकमधून गव्हाचे कट्टे फेकल्याने संपाला हिंसक वळण लागले. सकाळी १० वाजता लखमापूर, ब्राह्मणगाव, मुळाणे, शेमळी, अजमीर सौंदाणे येथील शेकडो शेतकऱ्यांनी मोटारसायकल रॅली काढून सटाणा येथे तहसील कार्यालयावर धडक दिली.निफाड तालुक्यात नैताळे येथे रस्त्यावर शेतमाल फेकून निषेध केला. लासलगाव, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने शेतमालाचे व्यवहार ठप्प झाले होते.नाशिक - औरंगाबाद रस्त्यावर बोकडदरे येथे ट्रक अडवून त्यातील कांद्याच्या गोण्या रस्त्यावर फेकून संताप व्यक्त करण्यात आला. वनसगावला संतप्त शेतकऱ्यांनी टायरची जाळपोळ केली. निफाड येथील सर्व दूध संकलन केंद्र पहिल्या दिवशी बंद ठेवण्यात आली होती. तसेच लासलगाव, पिंपळगाव बाजार समित्या बंद असल्याने व्यवहार ठप्प झाले होते.तेलाचा टॅँकरही खालीयेवला येथे शेतकऱ्यांनी कांदे, बटाटे, लसूण यासह सर्वच शेतमाल दिसेल त्या वाहनातून रस्त्यावर फेकला. तेलाचा टँकरदेखील रस्त्यावर खाली करण्यात आला. तेलाचे व तुपाचे डबे, गव्हाचे पोते यासह दिसेल तो शेतमाल रस्त्यावर आणून टाकला गेला. दुधाच्या पिशव्या असलेल्या गाड्या अडवून सुमारे पाचशे ते सातशे लिटर दुधाच्या पिशव्या फत्तेबुरु ज नाका चौफुली व बाजार समितीसमोर रस्त्यावर ओतण्यात आल्या.गव्हाचे कट्टे फेकलेसटाणा शहर, करंजाड येथे रास्ता रोको करून शेतमाल रस्त्यावर फेकल्याने एकच गोंधळ उडाला. गव्हाने भरलेल्या मालट्रकमधून कट्टे फेकल्याने संपाला हिंसक वळण मिळाले. पोलीस यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मालट्रकमधून आंदोलनकर्त्यांनी फेकले. गव्हाचे कट्टे व शेतमाल रस्त्यावर फेकला. साक्री-शिर्डी रस्त्यावर वाहने अडवून चक्का जाम केला.

दूध वाहतूक रोखलीनिफाड तालुक्यात टेम्पो, ट्रकमधील शेतमाल रस्त्यावर फेकणे, रास्ता रोको, दूध, भाजीपाला विक्र ी बंद आदी मार्गाने हे आंदोलन यशस्वी झाले. या तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने शेतमालाचे व्यवहार ठप्प झाले होते, तर या तालुक्यात दूध संकलन केंद्र बंद असल्याने या तालुक्यातून इतर शहरात जाऊ शकले नाही.