शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

कावळ्यांना लागलाय बाळासाहेबांचा लळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:45 IST

त्र्यंबकेश्वर : पितृ पंधरवडा असो की दशिक्र या विधी असो यावेळी सर्वांचाच कावळ्याची आठवन येते. जेव्हा कावळा अन्नाला शिवत नाही. तासन्तास होऊनही कावळा घास उचलत नाही तेव्हा त्याचे महत्त्व पटते. मात्र कावळ्यांसह पक्ष्यांवर प्रेम करत त्यंची भूक नित्यनेमाने भागविणारे त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सावंत यांची कहानी कही औरच आहे.

ठळक मुद्दे उपक्र म : दिवसातून दोन वेळेला भागवितात पक्ष्यांची भूक

त्र्यंबकेश्वर : पितृ पंधरवडा असो की दशिक्र या विधी असो यावेळी सर्वांचाच कावळ्याची आठवन येते. जेव्हा कावळा अन्नाला शिवत नाही. तासन्तास होऊनही कावळा घास उचलत नाही तेव्हा त्याचे महत्त्व पटते. मात्र कावळ्यांसह पक्ष्यांवर प्रेम करत त्यंची भूक नित्यनेमाने भागविणारे त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सावंत यांची कहानी कही औरच आहे. त्यांची दुचाकी चौकात येताच त्यांच्या डोक्यावर उडत थेट अटल अखाड्यापर्यंत कावळे बाळासाहेबांचा पाठलाग करतात. अटल अखाड्यासमोरील मैदानातखाऊ, शेव, पापडी, भेळ वगैरे काढेपर्यंत लहानमुलांप्रमाणेच कावळ्यांनाही धीर नसतो. काही वेळेस तर त्यांच्या हातातून खाऊ ओरबाडून पळतात. अवघ्या काही मिनिटात आणलेला खाऊ संपतो.ही कहानी नसून सत्य घटना आहे त्र्यंबकेश्वरमधील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक बाळासाहेब गणपत सावंत यांच्या भूतदयेची. बाळासाहेब कावळ्यांना लळा लावणारे व्यक्तिमत्व आहे. दररोज सकाळी 6 ते 7 व सायंकाळी 6 ते 7 असे दिवसातुन दोन वेळा कावळ्यांना खाऊ देण्याचा उपक्र म राबवितात. ते कुठे गावाला गेले तर सहका-यावर जबाबदारी सोपऊन जातात.पण कावळ्याचा खुराक बंद पडू देत नाहीत. बाळासाहेब सावंत या व्यक्तिमत्वाने सामाजिक भावनेने अनेक लोक उपयुक्त उपक्र म राबवलेले आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने बांधलेल्या वैकुंठभूमीची दयनीय अवस्था होती. पण पालिकेकडे वारंवार पाठपुरावा करु न पालिकेने सुंदर असे वैकुंठधाम उभारले त्या ठिकाणी गार्डनची संकल्पना राबवली. गावातील एक दानशुर नागरिक भरत नार्वेकर यांना त्यांनी ही संकल्पना सांगुन पिताश्रींच्या नावाने एक शववाहिकाही तयार करुन घेतली. श्रध्दांजलीपर कार्यक्र मासाठी माइकसह मायक्र ोफोनची व्यवस्था केली आहे. गरीब व आजारी माणसाला दवाखाना पैशांची मदत करायला लोकवरूगणीतुन बाळासाहेब तयारच असतात. बाळासाहेब म्हटले की साधा पांढरा पायजमा शर्ट व डोक्यावर टोपी असा पेहराव. हा माणुस जिल्ह्यात सामाजिक कार्यकत्ता म्हणुन ओळखला जातो. दीर्घ आजारी माणसांना विशिष्ट गादी असलेला पलंग दुरवरु न शव आणावयाचे असल्यास त्यासाठी शवपेटी कोणतेही भाडे न घेता त्यांच्याकडून दिली जाते. सध्या पालिकेकडे शवविच्छेदन कक्षासाठी जागा व दशनाम गोसावी समाजाच्या दफनभूमीसाठी जागेसाठी बाळासाहेबांचा पाठपुरावा सुरु आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरbirds sanctuaryपक्षी अभयारण्य