नाशिक : शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांच्या विचार व कृतीला अनुसरून समाजातील समत्व रुजविण्यासाठी यंदाही अक्षय तृतीयेला गंगापूर धबधब्याजवळील बालाजी मंदिर गर्भगृहात भाविकांना मुक्त प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आनंद जोशी यांनी दिली.या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून ९ मे रोजी सकाळच्या अभिषेक व आरतीनंतर सायंकाळी ७ पर्यंत भाविकांना गर्भगृहातून बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. वर्षभरात दर शुक्रवारी, एकादशी, ब्रह्मोत्सवातील १५ दिवस विविध अभिषेक व ज्यांनी वार्षिक दिनाची नोंदणी केली आहे, अशांनाच गर्भगृहात प्रवेश दिला जातो. जास्तीत जास्त भाविकांनी अक्षय तृतीयेच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिराचे व्यवस्थापक राजेंद्र जोशी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
बालाजी मंदिर गर्भगृहात अक्षय तृतीयेला भाविकांना मुक्त प्रवेश
By admin | Updated: May 8, 2016 00:26 IST