शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळांमध्ये ‘बाला प्रकल्प’

By admin | Updated: May 27, 2017 00:54 IST

नाशिक : विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी व त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वृद्धी व्हावी याकरिता ‘बाला प्रकल्प’ राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये गुजरातच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी व त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वृद्धी व्हावी याकरिता सर्वशिक्षा अभियानांतर्गत ‘बाला प्रकल्प’ राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत शाळांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली आहे. ‘बिल्डिंग एज लर्निंग एड’ अर्थात बाला प्रकल्पाची मूळ संकल्पना युनिसेफच्या समर्थनार्थ आर्किटेक्चरल रिसर्च अ‍ॅण्ड डिझाइन सेंटरच्या व्हीनासने विकसित केलेली आहे. भारतात या प्रकल्पाची अंमलबजावणी गुजरात राज्यातील २५५८ शाळांमध्ये सर्वशिक्षा अभियानांतर्गत करण्यात आली असून, तो यशस्वीही ठरला आहे. गुजरातमध्ये त्यासाठी स्थापत्य अभियंते, शिक्षक व मुख्याध्यापक यांना प्रशिक्षित करून पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. बाला प्रकल्पांतर्गत शाळांच्या भिंती, दरवाजे, खिडक्या, फर्निचर आदी साधनांवर विविध प्रकारची चित्रे, गणितांची सूत्रे, नकाशे, बाराखडी आदी रंगविले जाणार असून, मुलांना खेळताखेळता शिक्षण देण्याचा व स्वयंशिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शाळांच्या इमारतींची रचना व तेथील भौतिक सुविधांचा शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीत मोठा सहभाग असतो. त्यामुळेच भौतिक व पायाभूत सुविधांची निर्मिती करणे व मुलांना शिक्षणाची गोडी लागावी याकरिता उपक्रम राबविले जाणार असल्याचे उपासनी यांनी सांगितले.