शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बॅग कारखाना आगीत खाक

By admin | Updated: March 2, 2015 00:06 IST

सातपूरची घटना : एन. व्ही. आॅटोचे कोट्यवधींचे नुकसान

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एऩ व्ही़ आॅटो स्पेअर्स प्रा़ लिमिटेड या बॅग बनविण्याच्या कारखान्यास शनिवारी (दि़ २८) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली़ या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, अग्निशामक दलाच्या दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली़ जानेवारी महिन्यात अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्याला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते़सिडको येथील उद्योजक व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कैलास अहिरे यांचा सातपूर औद्योगिक वसाहतीत एऩ व्ही़ आॅटो स्पेअर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचा बॅग बनविण्याचा कारखाना आहे़ शनिवारी (दि़२८) मध्यरात्रीच्या सुमारास या कारखान्यास अचानक आग लागून कामाच्या वस्तंूसह संपूर्ण कारखान्यातील एका बाजूचे युनिट पूर्णत: जळून खाक झाले़ या कारखान्याच्या एका बाजूस प्रेस पार्ट, मेटल फ्रेमचे कामकाज चालते, तर याच कारखान्याच्या दुसऱ्या बाजूला शॉप लगेजचे काम सुरू असते़ या कारखान्याच्या शॉप लगेजमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने कंपनीमालक कैलास अहिरे यांना दिली़ ही आग इतकी भयानक होती की काही वेळातच कारखान्यातील लगेज शॉपमध्ये असणाऱ्या शंभराहून अधिक शिलाई मशिन्स, बॅग बनविण्यासाठी असलेला कोट्यवधी रुपयांच्या स्टॉकसह तयार असलेल्या बॅग जळून खाक झाल्या़ याबरोबरच कारखान्यातील संपूर्ण फर्निचर, एअर कंडिशनर, संगणक जळून खाक झाले, तर प्रेस पार्ट व मेटल फ्रेम या ठिकाणी आग पोहोचून येथील मशिनरी, वेल्ंिडग मशीन, ग्रार्इंडर, चाईल्ड पार्टचे नुकसान झाले़ कारखान्याच्या इमारतीलाही तडे गेले असून, खिडक्या, दरवाजे, शटर व लोखंडी वस्तुंचेही नुकसान झाले़या आगीची माहिती अग्निशामक दलास मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून फोम व पाण्याच्या फोर्सने आग आटोक्यात आणली़ सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आठ ते दहा अग्निशामक बंबांच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले़ दरम्यान, या आगीच्या घटनेची सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)