शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

बागलाण परिसरात पावसाअभावी पेरण्या लांबल्या

By admin | Updated: June 17, 2016 00:16 IST

बागलाण परिसरात पावसाअभावी पेरण्या लांबल्या

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरात जोरदार पाऊस न झाल्यामुळे पेरण्यांची कामे खोळंबली असून, शेतकरी चातकासारखे आभाळाकडे डोळे बघत आहेत.पावसाळा सुरू होऊनमहिना होत आला तरी पावसाला सुरुवात झाली नसून, खरीप पिकाच्या शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. जमिनीची नांगरणी, वखरणी, जमिनीत शेणखत मिळवणे आदि कामे पूर्ण झाली आहे. शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहे. परंतु सुरुवातीचे रोहिणी नक्षत्र कोरडे गेले तेव्हा शेतकऱ्याला मृग नक्षत्रात पाऊस पडेल, अशी आशा होती. मृग नक्षत्राच्या पावसाने खामखेडा परिसरातील सावकी, भऊर, पिळकोस, बगडू चाचेर, विसापूर आदि गावांतील परिसरात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या ठप्प झाल्या आहेत.रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले. त्यापाठोपाठ मृगही कोरडे जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाले आहे. मृग नक्षत्र लागून आठ-दहा दिवस होत आले तरी पावसाचे कोणतेही वातावरण दिसून येत नाही. दिवसभर नुसता वारा वाहत आहे. आकाशात काही प्रमाणात ढगही जमा होत आहेत. जोरदार पाऊस पडावा म्हणून देवाची प्रार्थना करीत आहेत. सकाळी उठल्यावर शेतकऱ्यांमध्ये पावसावर चर्चा होताना दिसून येत आहे. आज ना उद्या पाऊस येईल याची आस बळीराजाला लागली आहे. ज्या शेतकऱ्याकडे थोड्याफार प्रमाणात विहिरींना पाणी आहे. अशा शेतकऱ्यांनी मक्याची पेरणी केली आहे. सध्या शेतकऱ्याकडे पैसे नाही तरी त्याने खरिपासाठी हात-उसनवार करीत शेतकऱ्याने पेरणीसाठी बी-बियाणे घेऊन ठेवले आहे. जर एवढ्या आठ-दहा दिवसामध्ये पाऊस झाला नाही तर बियाणे वाया जाते की काय याची चिंता शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)