जळगाव नेऊर : एरंडगाव येथे अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध दारू विक्र ी व अवैध धंदे सुरू आहेत. हे धंदे त्वरित बंद करण्यासाठी माजी सरपंच भास्कर काळे व ग्रामस्थांनी शनिवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. नवनियुक्त पोलीस निरीक्षक पाटील यांना या उपोषणाबाबत समजताच त्यांनी रविवारी दुपारी एरंडगाव येथे काळे यांची भेट घेऊन अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.येथे अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध धंदे सुरू असून, अवैध दारू विक्र ी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी गामस्थांनी केली. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रस्त्यालगतच दारू विक्र ी होत असल्याने येणाऱ्या - जाणाºया विद्यार्थी- विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागतो. दारू विक्र ीचा कायमस्वरु पी बीमोड करण्यासाठी सर्व समाजातील व सर्व वयोगटातील समाजबांधवांनी एकत्र येत उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शविला होता. प्रहार शेतकरी संघटनेनेही आंदोलनात सहभाग घेऊन यावर तोडगा न निघाल्यास प्रहार स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. यावर पोलीस निरीक्षक पाटील यांनी तत्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यातआले.यावेळी माजी सरपंच भास्कर काळे, अनिल साताळकर, विलास रंधे, रवि साताळकर, वसंत शिंदे, प्रेमराज सुराणा, मनोज रंधे, सतीश काळे, वसंतराव झांबरे, सोपान पडवळ, संजय गायकवाड,अन्वर शहा, रशिद पटेल, निवृत्ती मढवई, नितीन पगारे आदी उपस्थित होते.एरंडगाव येथे पोलीस निरीक्षक पाटील यांना निवेदन देताना ग्रामस्थ.अवैध धंदे बंद करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागेजळगाव नेऊर : एरंडगाव येथे अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध दारू विक्र ी व अवैध धंदे सुरू आहेत. हे धंदे त्वरित बंद करण्यासाठी माजी सरपंच भास्कर काळे व ग्रामस्थांनी शनिवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. नवनियुक्त पोलीस निरीक्षक पाटील यांना या उपोषणाबाबत समजताच त्यांनी रविवारी दुपारी एरंडगाव येथे काळे यांची भेट घेऊन अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.येथे अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध धंदे सुरू असून, अवैध दारू विक्र ी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी गामस्थांनी केली. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रस्त्यालगतच दारू विक्र ी होत असल्याने येणाऱ्या - जाणाºया विद्यार्थी- विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागतो. दारू विक्र ीचा कायमस्वरु पी बीमोड करण्यासाठी सर्व समाजातील व सर्व वयोगटातील समाजबांधवांनी एकत्र येत उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शविला होता. प्रहार शेतकरी संघटनेनेही आंदोलनात सहभाग घेऊन यावर तोडगा न निघाल्यास प्रहार स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. यावर पोलीस निरीक्षक पाटील यांनी तत्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यातआले. यावेळी माजी सरपंच भास्कर काळे, अनिल साताळकर, विलास रंधे, रवि साताळकर, वसंत शिंदे, प्रेमराज सुराणा, मनोज रंधे, सतीश काळे, वसंतराव झांबरे, सोपान पडवळ, संजय गायकवाड, अन्वर शहा, रशिद पटेल, निवृत्ती मढवई, नितीन पगारे आदी उपस्थित होते.
अवैध धंदे बंद करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:35 IST
जळगाव नेऊर : एरंडगाव येथे अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध दारू विक्र ी व अवैध धंदे सुरू आहेत. हे धंदे त्वरित बंद करण्यासाठी माजी सरपंच भास्कर काळे व ग्रामस्थांनी शनिवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. नवनियुक्त पोलीस निरीक्षक पाटील यांना या उपोषणाबाबत समजताच त्यांनी रविवारी दुपारी एरंडगाव येथे काळे यांची भेट घेऊन अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.
अवैध धंदे बंद करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
ठळक मुद्देतत्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन