शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची पीकविमा भरण्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:11 IST

निसर्गावर आधारित असलेली आपली शेती शेतकऱ्यांनी आधारभूत शेती म्हणूनच व्यवसायात स्वीकारली आहे. त्यासाठी निसर्गात होणारे बदल, यामुळे अतिवृष्टी अवर्षण ...

निसर्गावर आधारित असलेली आपली शेती शेतकऱ्यांनी आधारभूत शेती म्हणूनच व्यवसायात स्वीकारली आहे. त्यासाठी निसर्गात होणारे बदल, यामुळे अतिवृष्टी अवर्षण दरवर्षीचे ठरलेले आहे. पिकाची नुकसान होतच असल्याने, त्याच्यावर पर्याय म्हणून शेतकरी दरवर्षी पीकविमा करण्यासाठी सरसावले होते. मात्र, गतवर्षी शेतकऱ्यांना नुकसान होऊनही पीकविमा नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकरी मोठ्या आशेने आपले नुकसान झालेल्या पिकाचा विमा करून घेतो. सदर विमा हा शेतकऱ्यांनी केलेला असतो. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान झाल्यामुळे शासकीय अनुदान प्राप्त होऊनही पीक नुकसान विमा कंपनी ग्राह्य धरत नाही. पीकविमा मिळत नसल्याने, शेतकरी या वर्षी विमा करून घेण्यासाठी तयारीत नसल्याचे चित्र दिसत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना पीक नुकसान झाले असतानाही, विमा कंपनीने लावून दिलेली वेगळे निकष सर्व शेतकऱ्यांना शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी आपली तक्रार पीकविमा कंपनीपर्यंत पोहोचण्यास विलंब केला होता. यामुळे पीकविमा कंपनीने त्यांच्या मुदतीत आलेल्या तक्रारींचे निवारण करून, शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई दिली होती. या दृष्टीने प्रत्येक गावातील नऊ ते दहा लाभार्थ्यांना त्याचा लाभ झाला होता. पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने नुकसान घोषित केले होते. त्यापैकी शेतकऱ्यांना दर हेक्‍टरी २० ते २५ हजार रुपयांचे अनुदानही प्राप्त झाले. मात्र, हे नुकसान सार्वजनिक लक्षात घेऊन विमा कंपनीने पीकविम्याचे निकष मागे न घेता, शेतकऱ्यांना वेगळेच निकष लावून विमा प्राप्त करून घेण्यासाठी भाग पाडले. ही व्यवस्था पुढील काळात होऊ नये, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना योग्य ती माहिती वेळेवर देऊन, तक्रार करण्यासाठी भ्रमणध्वनी सज्ञानता याचे मार्गदर्शन करावे, असे बोलले जात आहे.