शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल बंद ठेवण्याचा निर्णय मागे

By admin | Updated: March 20, 2017 22:39 IST

सोमवारी (दि.२०) संघटनेच्या झालेल्या बैठकीत या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी मेडिकल बंद ठेवण्याचा निर्णय जनहितार्थ मागे घेण्यात आल्याचे अध्यक्ष गोरख चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नाशिक : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्चअखेर तपासणी मोहिमेच्या नावाखाली गोळे कॉलनीमधील औषध विक्रेत्यांकडून खंडणी वसूल केल्याची तक्रार गेल्या बुधवारी (दि.१५) काही विक्रेत्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सदर प्रकार व्यावसायिक संघटनेच्या निदर्शनास आल्यानंतर नाशिक जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने अन्न- औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांची भेट घेऊन याबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत सोमवारी (दि.२०) संघटनेच्या झालेल्या बैठकीत या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी मेडिकल बंद ठेवण्याचा निर्णय जनहितार्थ मागे घेण्यात आल्याचे अध्यक्ष गोरख चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या शनिवारी गोळे कॉलनीमधील काही दुकानांना भेटी देत तपासणी केली. यावेळी औषध साठा विनापरवाना केल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी सदर साठा जप्त करण्याची धमकी देत औषध साठ्याच्या एकूण किमतीच्या वीस टक्के रक्कम देण्याची मागणी केल्याचा आरोप मधुसुदन कलंत्री, सचिन पटणी यांनी सरकारवाडा पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये करण्यात आला होता. दरम्यान, तीन लाख रुपयांची खंडणी संबंधित सहायक आयुक्त व औषध निरीक्षकांनी वसूल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई न केल्यामुळे संघटनेच्या वतीने शिष्टमंडळ पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची भेट घेणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.