शहरं
Join us  
Trending Stories
1
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
2
अमेरिका-चीनशी स्पर्धा; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, PM मोदींचा मोठा निर्णय...
3
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
4
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
5
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
6
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
7
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
8
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
9
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
10
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
11
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
12
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
13
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
14
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
15
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
16
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
17
Krishna Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
18
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
19
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
20
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!

पदवीधरला परिवर्तनाची मुहूर्तमेढ

By admin | Updated: January 18, 2017 00:45 IST

राधाकृष्ण विखे-पाटील : कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकाच व्यासपीठावर

नाशिक : नोटाबंदीनंतर तब्बल ६३ विविध प्रकारचे निर्णय केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅँकेला काढावे लागले, यातच नोटाबंदीचे अपयश आहे. आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने कॉँग्रेसच्या उमेदवाराचा विजय होऊन परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. पाटीदार भवन येथे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, जि. प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी झिरवाळ, माजी खासदार प्रताप वाघ, माजी आमदार जयंत ससाणे, अनिलकुमार अहेर, नानासाहेब बोरस्ते, एन. एम. आव्हाड, निवृत्ती डावरे, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अंबादास खैरे, श्याम सनेर, डॉ. सूचेता बच्छाव, तुषार शेवाळे, डीटीएफचे फिरोज बादशाह, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, कविता कर्डक, लक्ष्मण जायभावे, यशवंत पाटील, बंडू भाबड, हर्षल तांबे आदि उपस्थित होते.  विखे-पाटील पुढे म्हणाले, शिक्षण क्षेत्राचा विस्तार खूप मोेठा आहे. या क्षेत्रात काम करणे किती अवघड असते, याचा अनुभव आपण शिक्षणमंत्री असताना घेतला आहे. विद्यमान सरकारने शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा केला असून, शिक्षण क्षेत्राच्या या खेळखंडोबाबत आवाज उठविणे गरजेचे आहे.  माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, भाजपाच्या मेळाव्यात म्हणे नगरसेवकांना ४००, तर आमदारांना एक हजार कार्यकर्ते आणण्याचा कोटा दिला होता. मात्र, आघाडीला असे करण्याची गरज भासत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, फिरोज बादशहा यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)