शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:37 IST

गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचे दररोज दर्शन होत असल्याने शेतकरी व मजूरवर्ग शेतात जाण्यासाठी धजावत नाही. ग्रामस्थांच्या मागणीनंतर वनविभागाने नांदूरशिंगोटे-चास रस्त्यावरील कालव्यालगत पिंजरा लावला आहे.

ठळक मुद्देघबराट : भोजापूर कालव्यालगत पिंजरा

नांदूरशिंगोटे : परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचे दररोज दर्शन होत असल्याने शेतकरी व मजूरवर्ग शेतात जाण्यासाठी धजावत नाही. ग्रामस्थांच्या मागणीनंतर वनविभागाने नांदूरशिंगोटे-चास रस्त्यावरील कालव्यालगत पिंजरा लावला आहे.नांदूरशिंगोटे परिसरातील दोडी, मानोरी, कणकोरी आदी भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नांदूरशिंगोटे-चास रस्त्यावर भोजापूर कालव्यालगत मोठ्या प्रमाणात वनविभागाचे पडीक जंगल आहे. तसेच चास खिंडीजवळ शेतजमिनी आहेत. चार दिवसांपूर्वी भोजापूर कालव्यालगत रात्री दहा वाजेच्या सुमारास बिबट्या दिसला होता. त्यानंतर गुरु वारी रात्री शेळके या व्यक्तीलाही शेतातील पिकांना पाणी देताना बिबट्याचे दर्शन घडले. त्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. वनपाल प्रितेश सरोदे, वनरक्षक के. आर. इरकर यांच्यासह कर्मचाºयांनी शुक्र वारी परिसराची पाहणी करून दुपारनंतर कालव्यालगत पिंजरा लावला.डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बोगदेवाडी (ठाकरवाडी) भागात गुरु वारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास महादू सावळीराम आगिवले यांच्या मेंढीवर बिबट्याने हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली. आगिवले यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार