शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बालकाची भरदिवसा कोयत्याने निर्घृण हत्या

By admin | Updated: July 14, 2017 01:05 IST

पंचवटी : जावयाने सासूसह मेव्हणीच्या आठ वर्षीय बालकाची हत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : मखमलाबाद शिवारातील मूळच्या गंधारवाडी वस्तीमध्ये राहणाऱ्या खराटे कु टुंबाच्या जावयाने सासूसह मेव्हणीच्या आठ वर्षीय बालकाची भरदिवसा कोयत्याने निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि.१३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंदाबाई दशरथ खराटे व दशरथ सोनू खराटे हे दाम्पत्य सध्या पाथर्डी फाटा येथे वास्तव्यास आहे. खराटे यांच्या एका मुलीचा विवाह रामवाडी येथील तळेनगर परिसरात राहणाऱ्या मोतीराम धोंडीराम बदादे याच्याशी झाला असून, बदादे हा सीबीएस परिसरात हातगाडीवर स्टेशनरी विक्र ीचा व्यवसाय करतो. संशयित जावई बदादे याने काही दिवसांपासून सासरे खराटे यांच्याकडे एक ते दीड लाख रु पयांच्या मागणीचा तगादा लावला होता. वारंवार मागणी करूनही पैसे देत नसल्याचा राग मनात धरून गुरु वारी संशयित मोतीराम याने सासू मंदाबाई खराटे (५५) व मेव्हणीचा ८ वर्षाचा मुलगा नैतिक लिलके या दोघांना काहीतरी खोटे सांगून पाथर्डी फाटा येथून दुचाकीवर बसवून रामवाडी जवळील गोदाकाठलगतच्या बाभळीच्या जंगलात नेऊन धारदार शस्त्राने मंदाबाई व नैतिकवर क्रूरपणे हल्ला चढवित ठार केले. डोक्यावर व मानेवर गंभीर खोलवर वार लागल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. संशयिताने दोघांचे मृतदेह सुमारे शंभर मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. पोलिसांना हल्ल्याच्या ठिकाणापासून दूर अंतरावर मृतदेह आढळून आले. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून, त्याचा सर्वत्र शोध घेतला जात आहे. सर्व पोलीस ठाण्यांना संशयिताचे छायाचित्र पाठविण्यात आले असून, ग्रामीण पोलिसांसह रेल्वे, बसस्थानकांवरही पोलिसांना सतर्क करण्यात आल्याचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.