शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बालकांनाही असू शकतो डायबिटीस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST

नाशिक : गत दशकाच्या उत्तरार्धापासून बालकांमध्ये मधुमेह आढळण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या बालकांना तहान, लघवी, ...

नाशिक : गत दशकाच्या उत्तरार्धापासून बालकांमध्ये मधुमेह आढळण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या बालकांना तहान, लघवी, भूकही सामान्यांच्या तुलनेत खूप जास्त लागूनही त्यांचे वजन वाढत नाही. अशा बालकांना ‘टाईप १’ प्रकारातील मधुमेह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी लक्षणे असणाऱ्या बाळाच्या पालकांनी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरू लागले आहे. शहरी भागातील बालकांमधील 'टाइप १' मधुमेहाचे प्रमाण दर वर्षी तीन टक्क्यांनी वाढत असल्याचे समोर आले आहे.

इन्फो

आई-वडिलांना मधुमेह असेल तर...

महिलांमधील वाढता ताण हे त्यांच्यातील वाढत्या मधुमेहाचे मुख्य कारण आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत एकूणच महिलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, कौटुंबिक जबाबदारी व कामाचा ताण यामुळे महिलांमधील मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसते. त्यामुळे गर्भवती महिलांद्वारे होणाऱ्या बाळाला जन्मत:च होणारा पॉलिजेनिक मधुमेह होण्याची शक्यता असते. तर काही कुटुंबांमध्ये आई, वडील दोघांनाही मधुमेह असल्यास त्यांच्या बाळालादेखील वंशपरंपरेेने मधुमेह होण्याची शक्यता असते.

इन्फो

लक्षणे आणि काळजी

जन्माच्या वेळी कमी वजन असणाऱ्या बालकांना जास्त खायला दिले जाते. त्यामुळे त्याच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे नवजात बालकांमध्ये मधुमेहाचा धोका निर्माण होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ नोंदवितात. लहान मुलांमध्ये 'टाइप वन' मधुमेह आहे. असे निदान झाल्यावर कुटुंबाने त्या मुलाची विशेष काळजी घ्यावी. तसेच ज्या बाळांना तहान जास्त लागणे, लघवी तसेच भूक जास्त लागूनही वजन कमी होत जाते, अशा बाळांच्या पालकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.

कोट

काही कारणांमुळे ज्या बाळांची रोग प्रतिकार शक्ती स्वत:च्या बीटा पेशींना मारते, त्या बाळांना टाईप-१ प्रकारचा डायबिटीस होतो. अशा प्रकारचा डायबिटीस होण्याचे प्रमाण गत दोन वर्षात मला आठवड्याला एक नवीन बाळ उपचारासाठी येत असून ही वाढ खूप गंभीर आहे. त्याशिवाय पोस्ट कोविड काळात जाड मुलांना होणाऱ्या टाईप २ डायबिटीसचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे.

डॉ. तुषार गोडबोले, बाल मधुमेहतज्ज्ञ

--------------

ही डमी आहे.