शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

‘अजुनी रुसुनि आहे’!

By admin | Updated: July 8, 2014 01:12 IST

‘अजुनी रुसुनि आहे’!

 

नाशिक : एक नव्हे, दोन नव्हे, तीन तीन आमदार, नाराज वसंत गिते यांची मनधरणी करण्यासाठी थेट राजसाहेबांच्या आदेशावरुन वसंतभाऊंच्या निवासस्थानी धावत गेले. भाऊंना पुढे घालून सरकारी विश्रामगृहावर घेऊन आले. बंद दरवाजाआड गुप्त चर्चा झाली. ती सुरु असतानाच खोलीचा दरवाजा उघडून राजसाहेब ताडकन बाहेर पडले. कोणाशीही चकार शब्द न बोलता, गाडीत बसून मुंबईकडे रवानाही झाले. वसंतभाऊंभोवती साहजिकच गराडा पडला. ‘आपण नाराज नाही’, असे त्यांनी सांगूनही टाकले, पण त्यांचे शब्द आणि त्यांची देहबोली यांच्यात कुठेही मेळ मात्र दिसत नव्हता.जेमतेम पंधरा-वीस मिनिटांच्या या नाट्याने मनसेत ‘आॅल इज नॉट वेल’ असल्याची प्रचिती येऊन गेली. पुढील चर्चेसाठी म्हणे गिते यांना उद्याच मुंबईत पाचारण केले गेले आहे. राज ठाकरे यांनी अलीकडेच स्थानिक पातळीवर काही संघटनात्मक बदल केले पण ते करताना, पक्षाचे सरचिटणीस असलेल्या व स्थापनेपासून पक्षाची घट्ट कास धरुन असलेल्या वसंत गिते यांना त्यांनी विश्वासात घेतले नाही. साहजिकच, गिते आणि त्यांचे समर्थक नाराज आहेत अशी चर्चा होत असताना, रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या खुद्द राज ठाकरे यांनाच या गटबाजीचे दर्शन घडले. गुडघ्याला दुखापत झाल्याचे निमित्त करून स्वत: गिते तर विश्रामगृहावर गेलेच नाहीत; परंतु जिल्हाप्रमुख आणि माजी शहरप्रमुखांबरोबरच सुमारे पंधरा नगरसेवकही गैरहजर राहिल्याने राज यांना त्याची दखल घ्यावीच लागली.सोमवारी सकाळी राज हे गिते यांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात त्यांनी आमदार नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर आणि गिते यांच्याशी जवळीक असलेले दीपक पायगुडे यांनाच गिते यांच्या निवासस्थानी पाठवून दिले. मुंबई नाका येथील गिते यांच्या निवासस्थानीच पदाधिकारी आणि नगरसेवकांची गर्दी जमा झाली होती. सुमारे दोन तास गिते यांच्या घरी बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर सर्वजण बाहेर आले आणि एकाच मोटारीत बसून शासकीय विश्रामगृहावर आले. राज ज्या कक्षात उतरले आहेत तेथे चर्चा झाली. माजी शहराध्यक्ष समीर शेटे हेही यावेळी उपस्थित होते. परंतु बैठकीनंतर दहा मिनिटांतच राज ठाकरे बाहेर पडले आणि सरळ मोटारीत बसून मुंबईकडे रवाना झाले.यानंतर बाहेर पडलेल्या गिते यांनी, आपण पक्षावर नाराज नाही. गेली २७ वर्षे मी सार्वजनिक जीवनात काम करीत आहेत. उलट आणखी जोमाने काम करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज यांच्या दौऱ्यातील आपली अनुपस्थिती केवळ गुडघा दुखापतीमुळे होती. त्यामुळे बऱ्याच चर्चा झाल्या. आता राज यांनी मुंबईस्थित डॉक्टरांची वेळ घेतली असून, मंगळवारी तेथे जाणार आहे. तेथेच राज यांच्याशी चर्चा करणार आहे, असेही गिते यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्यासह अनेक नगरसेवकही उपस्थित होते. नितीन सरदेसाई आणि दरेकर यांनी मात्र माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. यावेळी गिते समर्थकांनी घोषणाबाजी करीत शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केला; परंतु गिते यांनी त्यांना थांबवले.गिते यांनी काहीही दावे केले असले, तरी राज यांचे तडकाफडकी निघून जाणे आणि मुंबई येथे पुन्हा चर्चेसाठी बोलावणे यामुळे नाराजीनामा नाट्य संपुष्टात आले नाही हेच स्पष्ट झाले. आता मुंबईतील चर्चेत काय घडते, यावर गिते यांची पुढील वाटचाल अवलंबून आहे. (प्रतिनिधी)